Home आपला जिल्हा कोरपना तालुक्यात कोरोणाच्यां आड अवैध धंदे जोरात !प्रशासकीय यंत्रणा कोमात !

कोरपना तालुक्यात कोरोणाच्यां आड अवैध धंदे जोरात !प्रशासकीय यंत्रणा कोमात !

21
0

कोरपना…

संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू आहे.ही लाट थोपवण्यासाठी शासनप्रशासन आपापल्या परीने शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सर्वत्र कलम १४४ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र पाहून प्रशासनाची झोप उडाली आहे.अशा परिस्थितीत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदी असताना याच जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात गाव तिथे अवैध दारू,सट्टा,जूगार इतर अवैध धंदे चालतातच कसे हा संशोधनाचा विषय ठरत आहे.हल्ली सट्ट्याच्या धंद्यांसाठी तालुक्यातील काही सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना जणू शासनाने परवानेच दिले की काय असे चित्र पहायला मिळत आहे.
सध्याच्या परिस्थितीत या लॉकडाऊन मध्ये कोरपना शहराच्या दोन ते तीन पॉईंटवर चोविस तास पोलीस उभे आहे. असे असताना कोरपना येथील आठवडी बाजारात दारूचा पुरवठा होतो.सामान्य लोकांजवळ एखादा पव्वा मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो आणि पुरवठा करणाऱ्यांकडे डोळे झाक केला जातो “चोर सोडून संन्याशाला फाशी” असला हा प्रकार असून गेल्या दोन,तीन महिन्यात पोलिसांनी अवैध दारू व्यवसायिकांवर किती कारवाया केल्या यावरून दिसून येईल.पोलीस अशा अवैध धंदे करणाऱ्यांकडे काणाडोळा करून प्रोत्साहन तर देत नाही ना अशी शंका सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहे. आजघडीला अशी परिस्थिती आहे की जर आपण पाहिले तर सर्वत्र संचारबंदी,जमावबंदी आहे.राज्यात कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असून शासन ओरडून सांगत आहे की,मास्कचा वापर करा,सोशल डिस्टंसिंग ठेवा मात्र असे होताना दिसत नाही.
याचे जीवंत उदाहरण म्हणजे दोन दिवसांपूर्वीच जनसत्याग्रह संघटना अध्यक्ष तथा राकाँचे जेष्ठ नेते सैय्यद आबीद अली यांनी कोरपना जवळील परसोडा,तांबाडी फाटा येथे सट्टापट्टी व जुगार अड्याकडे फेरफटका मारला तर त्याठिकाणी सट्टापट्टी चालक चमचमीत चारचाकी वाहन तिथे लावून,थंड्या पाण्याची सुविधायूक्त पेंडाल मध्ये दोनशेच्या जवळपास विना मास्क व सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी करीत असलेल्या लोकांच्या उपस्थितीत बिनधास्त सट्टापट्टी फाडली जात होती तर दुसर्‍या ठिकाणी कुलरच्या गारव्यात जुगार खेळला जात होता.आता प्रश्न पडतो की कोरोनाच्या या महामारीत यांना लॉकडाऊन, जमावबंदी व इतर शासनाचे नियम लागू नाही का ? शहरात जर कुणी मास्क वापरला नाही तर संबंधित विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतात,एखाद्या दुकानात जर मास्क वापरला नाही,सोशल डिस्टंसिंग दिसली नाही दंडात्मक कारवाई करतात,मग या सट्टे व जूगार वाल्यांना शासनाने परवाने देऊन कोरोना पसरवण्याची खुली छूट दिली आहे का ?असा प्रश्न आबीद अली यांनी उपस्थीत केला आहे.वास्तविक पाहता इतरांप्रमाणे यांच्यावरही शिस्त भंग व शासनाचे नियम मोडल्या संबंधी कारवाई होणे व तात्काळ हे सर्व अवैध धंदे बंद होणे गरजेचे आहे.मात्र हल्लीच्या काळात ही प्रथा बंद आल्याचे दिसून येते आहे.याठिकाणी सुरू असलेली सट्टापट्टी,जूगार संबंधी माहिती नुकतीच आबीद अली यांनी भ्रमणध्वनीद्वारे पोलीस अधीक्षकांना दिली असून लॉकडाऊन, जमावबंदी असताना हे अवैध धंदे खुलेआम, बिनधास्तपणे चालत असल्याची माहिती दिली आहे.त्यावर त्यांनी सांगितलं की मी लगेच कारवाई करायला सांगतो. परंतु आम्हाला अशी माहिती आहे की,ठाणेदारांनी सट्टापट्टी चालकांना सांगितले की बंद करा.म्हणजे एकीकडे संपूर्ण लॉकडाऊन आणि दुसरीकडे पोलीसांच्या मदत व आशिर्वादाने असे अवैध व्यवसाय सुरू.असे असेल तर हा प्रकार कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घातक व वाढवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणारा ठरेल यात तिळमात्र ही शंका नाही. म्हणून यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आबीद अली यांनी शासनाकडे केली आहे.मात्र कारवाई होणार ! याची शाश्वती कमीच,अशी उपहासात्मक चर्चा नागरिकांत सुरू आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here