Home आपला जिल्हा सुधीर भाऊ चे रेती तस्करी बाबतचे पत्र महसूल विभागाकडून दुर्लक्ष ! रेती...

सुधीर भाऊ चे रेती तस्करी बाबतचे पत्र महसूल विभागाकडून दुर्लक्ष ! रेती तस्काराणा कोणत्या नेत्याचे पाठबळ …

87
0

राजुरा …

रेती तस्कारा विरोधात राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी राजुरा चे उपविभागीय अधिकारी याना एक पत्र पाठविले ,परंतु त्या पत्राची अजूनही दखल घेतली नसल्याने ,आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे .
राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस रेती तस्कर रेतीची चोरी करीत ,असल्याने ,महसूल विभगाला कोट्यवधी रुपयांचा फ्टका बसला आहे,
पोलीस विभाग रात्रीला शहरात गस्त करतात की नाही ,त्याणाच माहीत ,जर गस्त करीत असेल तर त्यांना रात्रीला रेती चोरी करणारे सापडले असते ,जर पोलीस गस्त करीत असेल ,तर त्यांचे रेती तस्करासोबत अर्थपूर्ण संबंध जोडल्या गेले असेल ,मागील एक वर्षापासुन कोरोणा काळात रेती तस्करांनी महसूल विभागाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे,
लॉक डाऊन च्यां तिसऱ्या दिवशी पोलीस बिना मास्क,विनाकारण फिरणाऱ्या लोकावर कारवाई केली ,आणि शासनाच्या तिजोरीत दहा ,बारा हजार जमा केलेत ,तेच काम महसूल विभाग ,पोलीस यांनी रेती तस्करावर मुसक्या आवळल्या असत्या तर आतापर्यंत लाखो रुपये जमा झाले असते ,पण रेती तस्कर ,तलाठी ,आणि पोलीस यांची आघाडी तर झाली नाही ना जनतेत चर्चेला सर्वात झाली आहे,
भारतीय जनता पक्षाचे युवा जिल्हा नेते यांनी तहसीलदारांना लेखी पत्र देऊन रेती तस्करी बंद करावी अशी मागणी केली .मात्र या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याने, युवा नेते सचिन शेंडे यांनी भाजपचे नेते माजी अर्थमंत्री सुधीर भाऊ याना पुन्हा पत्र दिले,सुधीर भाऊंनी राजुरा उपविभागीय अधिकारी याना 14 तारखेला लेखी पत्र दिले .परंतु अजून पर्यंत पत्राची कोणतीही दखल महसूल विभागांनी घेतली नसल्याने ,रेती तस्कर किती वरचढ झालेत हे दिसून येत आहे.मुंबईला जसे वसुली अधिकारी म्हणून वझे आता आपल्या कर्माची फळे भोगत आहेत तसेच राजुरा शहरात वसुली अधिकारी कोणाच्या आश्रयाने रेती तस्कर याना मोकळे रान करून दिले ,भविष्यात रेती तकराची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही .वेळीच योग्य उपचार करणे गरजेचे आहे ,नाहीतर कोरोना सारखा प्रकार होईल ,तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे आणि बेरोजगारी याचाही लोकप्रतिनिधींनी विचार करावा आज परस्थिती हातात आहे.कोरोणा मुळे अनेका चे आर्थिक चक्र थांबले आहेत मागील वर्षी कसे जीवन जगलेत फक्त त्यांनाच माहीत 5 किलो अनाज मोफत देऊन पोट भेट नाही,आता पुन्हा धंदे बंद,पुढे किती दिवस राहतील त्याचा अंदाज नाही .आज लोकप्रतिनिधी पेक्षा अधिकारी ,कर्मचारी वरचढ होताना दिसत आहे .जनतेची कामे ठप्प पडली.
हंगामात सर्वच लोकांना आर्थिक फटका बसला आहे.गेल्यावर्षी सारखे वीज बिल दुकान सुरू नसताना भराव लागणार आहे.सरकारला नेहमी , लॉक डाऊन लाऊन जनतेवर उपासमारीची पाळी आणणे सुद्धा परवडणार नाही .आता जनेतेचे लक्ष त्या सुधीर भाऊ च्या पत्रावर लागले आहे.

राजुरा तहसील चे तहसीलदार श्री ,गाडे साहेबांना 31/03/2021 ला सास्ती जिल्हा परिषद सर्कल ला खुले आम भर रात्री आणि पहाटे, रेतीतस्करी सुरू आहे म्हणून गेल्या 10 ,15 दिवसा आदी तहसीलदार साहेबांना भाजपा युवा मोर्चा तर्फे निवेदन देण्यात आले तरी अजून ही ह्या सास्ती जिल्हा परिषद सर्कल मध्ये रेती तस्करी सुरू आहे ,ह्या सर्कल मध्ये वर्धा नदी ,नाला,वगर ,सास्ती शिवलंन ,रामपूर ,अश्या अनेक ठिकानून ,रेती तस्करी करतात आणि ,गावातील गरीब लोकांना प्रति 1 ट्रक्तर,,5,ते 6, हजार रुपयांनी विकतात,,सर्व गावातील गोर गरीबांना घर कामा साठी लागलेली रेती आता एवढ्या महाग दराने विकत घावि लागत,,,आहे ,,,तरी तहसीलदार पुन्हा एकदा विनंती करत आहे की त्यांनी लवकरात लवकर ,,,या सर्कल च्या रेतीतस्करांकडे लक्ष देयांत यावे ,,नाही तर ,,समस्त गावकरी,व ,भाजपा युवा मोर्चा रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्यात येणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.तहसीलदारांना निवेदन तर दिले,पण त्याची साधी दखलही घेतली नसल्याचे,समजते .एका राष्ट्रीय पक्षाचे भाजपा युवा मोर्चा तेही जिल्हा पातळीवरील नेते आणि त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली तर नाही ना !शहरात या निवेदन बाबत चर्चा सुरू आहे.राज्यात लॉक डाऊन सुरू झाले आज अनेक दुकान बंद आहे नियमाच पालन करताना दिसत आहे,तर दुसरीकडे मात्र रेती तस्करांनी आपले दुकान रात्रीचे वेळेस सुरू केले रात्रभर रेती तस्करी करायची दिवसा शाव रात्री चोर ”अशी अवस्था ,रेती तस्कर,तलाठी ,आणि तीन ,चार पुलिस यांची महाआघाडी तर झाली नाही ना !या पूर्वी तहसीलदारांना पत्र दिले होते.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here