Pratikar News
चंद्रपुर – जिल्ह्यात सुरू असलेला अवैध दारूचा महापूर थांबविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी रामनगर हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध दारू विरोधात पोलीस निरीक्षक रोशन यादव यांना ऑलआऊट मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.
पोलीस अधिक्षकांच्या आदेशावर पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी आपल्या चमुसह अवैध दारूचं माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या जलनगर परिसरातील खंजर मोहल्ल्यात धाड मारली असता त्या ठिकाणी मोहा दारूची फॅक्टरी असल्याचं चित्र समोर आले.
पोलिसांनी तात्काळ आरोपी सागर रामकिशोर कंजर यांचेकडून 50 लिटर मोहा दारू किंमत 20 हजार व 1200 लिटर मोहा सडवा किंमत 3 लाख 60 हजार असा एकूण 3 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, आरोपी अतिष रामकिशोर कंजर यांचेकडून 1800 लिटर मोहा सडवा किंमत 5 लाख 40 हजार, आरोपी मुन्नीबाई हरी कंजर यांच्याकडून 1200 लिटर मोहा सडवा किंमत 3 लाख 60 हजार, आरोपी मंदा रामकिशोर कंजर यांचेकडून 400 लिटर मोहा दारू व सिलेंडर, लोखंडी शिगड्या व भांडे एकूण किंमत 8 लाख 10 हजार 200 रुपये, बंगाली कॅम्प येथील आरोपी प्रशांत नकुल बिश्वास यांचेकडून 15 नग विदेशी दारू किंमत 2 हजार 40 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
अटकेतील आरोपीवर महाराष्ट्र दारू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
वरील सर्व गुन्ह्यांमध्ये एकूण 22 लाख 72 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मलिक, एकरे व पोलीस कर्मचारी यांनी यशस्वीपणे पार पाडली.