Home आपला जिल्हा बरांज ग्रामवासियांचा प्रशासनाविरोधात एल्गार ! प्रकल्पग्रस्त नरेंद्र जिवतोडे पेट्रोल घेऊन...

बरांज ग्रामवासियांचा प्रशासनाविरोधात एल्गार ! प्रकल्पग्रस्त नरेंद्र जिवतोडे पेट्रोल घेऊन गळ्यात फास टाकून चढले झाडावर !

45
0

बरांज ग्रामवासियांचा प्रशासनाविरोधात एल्गार !

प्रकल्पग्रस्त नरेंद्र जिवतोडे पेट्रोल घेऊन गळ्यात फास टाकून चढले झाडावर !

पोलिसांची ग्रामस्थांवर कारवाई !

भद्रावती : भद्रावती तालुक्यातील बरांज येथे नुकतीच कर्नाटक खान सुरूवात करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षापासून या खाणीमध्ये जमिनी गेलेले प्रकल्पग्रस्त या अन्यायाच्या विरोधात लढा देत आहेत, परंतु त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. कर्नाटक एम्टा खाण सुरू झाल्यानंतर करंज्या गावातून जड वाहनांची वाहतुक जात होती महत्त्वाचे म्हणजे ग्रामसभेची यासाठी परवानगी घेतली नाही बरं वासी यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही तसेच प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न अद्यापही खोळंबलेला आहे.
या मुद्द्यांवर आज (दि. १७) बरांज वासियांनी जड वाहनांची वाहतूक रोखली व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी नरेंद्र जीवतोडे यांनी तहसील ऑफिस च्या झाडावर चढून गळ्यात फासा टाकलेला आहे व एक पेट्रोलची बॉटल आणि माचिस घेऊन आत्मदहनाचा आत्महत्येचा हेतूने चढलेले आहे, यामुळे प्रशासनामध्ये खळबळ माजली असून यासंदर्भात बोलताना पंचायत समितीचे सभापती प्रवीण ठेंगणे यांनी पोरान बासी अन्वर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हा लढा असून तो न्याय मिळेल पावेतो कायम राहील असे सांगितले. हाती आलेल्या सूत्रानुसार भद्रावती पोलिसांनी बर आणि वासियांना भद्रावती पोलीस स्टेशनला बोलविले असल्याचे कळते.

बरांजस्थित कर्नाटका एम्टा कोळसा खाण ही ३१ मार्च २०१५ पासून बंद झाली. आता ही खाण पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, कोळसा खाण घोटाळ्यानंतर या खाणीचा मालक कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड आहे. परंतु, कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीकडून अजूनपर्यंत प्रकल्पबाधित गावकरी, खाण कामगारांच्या समस्या सोडविल्या नाही. बरांज खुली कोळसा खाणीतील आधीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांना कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, खाण बंद झाली तेव्हापासून म्हणजे १ एप्रिल २०१५ पासून कामगारांचे थकीत वेतन द्यावे, खाण सुरू होण्याअगोदर सीएमपीएफ खात्यात कामगारांचे भविष्य निर्वाह निधी जमा करण्यात यावे, बरांज (मोकासा) व चेकबरांज (मानोरा) या दोन्ही प्रकल्पबाधित गावांचे खाण सुरू करण्याअगोदर पुनर्वसन करण्यात यावे, महाराष्ट्र शासन व कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड यांच्यात १५ जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या पुनर्वसन पॉलिसीमध्ये खाण सुरू होण्यापूर्वी सुधारणा करण्यात यावी, प्रकल्पबाधित गावातील भूसंपादन केलेल्या शेतकरी किंवा त्यांच्या मुलांना कंपनीच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, बरांज (मोकासा) व चेकबरांज (मानोरा) या दोन्ही प्रकल्पबाधित गावांतील उर्वरित शेतजमीन भूसंपादित करावी, या मागण्यांचे निवेदन खासदार, जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, या मागण्या सोडविण्याबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नाही आणि आज ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला.
आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here