Home Covid- 19 सुगंधी तंबाखू ची विक्री जोरात राजुरा कर्नल चौक जवळील किराणा दुकानातून...

सुगंधी तंबाखू ची विक्री जोरात राजुरा कर्नल चौक जवळील किराणा दुकानातून सुगंधी विक्री जोरात नगर परिषद चे दुर्लक्ष !!!

98
0

राजुरा ..
राजुरा नगर परिषद हद्दीत येत असलेल्या कर्नल चौक जवळ असलेल्या किराणा दुकानातून बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूची विक्री जोरात सुरू आहे.किराणा दुकान म्हणजे जीवनावश्यक असल्याने,किराणा दुकानदार पान टपरी चालविणाऱ्या ना विक्री करीत असल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे,तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरां खाणारे लोक असल्याने ,एकत्र बसतात आणि त्यातच लागण होत असल्याचे चित्र समोर येत आहे.असेच एक चित्र राजुरा जवळ असलेल्या धोपटला कालणी मध्ये एका मित्रासोबत इतर मित्र बसत होते ,एकानी सर्वांना खरा चारला आणि सर्वच कोरोना बाधित झाले.
गेल्या वर्षी नगर परिषद कडून शहरात फवारणी केली होती या वर्षी मात्र दुर्लक्ष दिसत आहे.शहरात मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूवर बंदी असूनही विक्री जोरात सुरू आहे, सद्या आरोग्य विभाग ही रिक्त पद असल्याने कामाचा बोझा आणि वाढत असलेले रुग्ण आणि औषधाचा तुटवडा नागरिकांसाठी धोक्याची सूचना देत तर नाहीना !खाजगी दवाखान्यात गरीब माणूस खर्च करू शकत नसल्याने ,सरकारी हस्पितल मध्येच आपला उपचार करीत असतो ,खाजगी दवाखान्यात पाय ठेवायला जागा नसते तरी लोक तिकडेच जातात ,वरिष्ठांनी राजुरा रुग्णालयात कर्मचारी औषध आणि ज्या काही इतर समस्या आहेत त्या दूर कराव्या अशी जनतेची मागणी आहे.
घरी राहा ,सुरक्षित राहा,बंदी असलेल्या तंबाखूचे सेवन करू नका,दिवसभरात तीन वेळा बिगर दुधाचे चहा पीत राहा ,

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here