Home आपला जिल्हा माथरा गावात स्वच्छता अभियान अंतर्गत रस्त्याच्या कडेला असलेले शेणखत ढिगारे उचलून...

माथरा गावात स्वच्छता अभियान अंतर्गत रस्त्याच्या कडेला असलेले शेणखत ढिगारे उचलून केली स्वच्छता …सरपंच हरिदास झाडे चा संदेश गाव स्वच्छ ठेवा …

113
0

माथरा…

दिनांक 16 एप्रिल 2021 रोजी ग्रामपंचायत खामोना अंतर्गत मौजा माथरा येथे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याची जनजागृती मोहीम आणि गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला असणारे शेणखताचे ढिगारे हटविण्याची ग्रामस्वच्छता मोहीम जे सी बी आणि ट्रॅक्टर लावून ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आली.
ग्रामपंचायत खामोना येथील सरपंच श्री हरिदास झाडे, उपसरपंच सौ शारदा तलांडे, ग्रामपंचायत सदस्य श्री मारोती शामराव चन्ने, सौ सोनी नवनाथ ठक, सौ अलका दिलीप वैद्य, ग्रामसेवक श्री मिलिंद देवगडे, तलाठी श्री सुरेंद्र चिडे, पोलीसबंदोबस्तातील पोलीस कर्मचारी श्री जनार्धन गावतुरे आणि श्री प्रवीण डवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांच्या सहकार्याने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी महसूल विभाग, पोलीस यंत्रणा आणि पंचायत समिती राजुरा यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here