Home Covid- 19 राजुरा शहरातील काही खाजगी दवाखाने कोरोना हॉट स्पॉट होत आहे ,काही मेडिकल...

राजुरा शहरातील काही खाजगी दवाखाने कोरोना हॉट स्पॉट होत आहे ,काही मेडिकल दुकानात गर्दी सर्वत्र उल्लंघन !

147
0

राजुरा…

काही खाजगी दवाखाने कोरोना हॉट स्पॉट होत आहे ,काही मेडिकल दुकानात गर्दी हॉट स्पॉट !!

*खाजगी क्षेत्रातील डॉक्टर्स बांधवांना आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच औषध विक्रेते सर्वांनाच हात जोडून कळकळीची विनंती आहे.* आपन आपले दवाखाने सुरु केले आपनाकडे मोठ्या आशेने रुग्ण येत आहेत ,त्यानां योग्य उपचार मिळाले पाहिजे ,परन्तु आपले दवाखान्यात जे रुग्ण येतात त्यानां बसन्यासाठी रुग्ण कुठे बसविता ,नियमचे उल्लंघन तुम्ही करता ,नंतर मेडिकल मध्ये गेल्यावर त्या ठिकाणी गर्दिच दिसत असते .
*आजच्या या कठीण प्रसंगात तुमच्याकडून सगळंच चुकतंय अस नाही परंतु आपण फक्त पैसा मिळविण्यासाठी काम करू नका..कोरोनाच्या संक्रमणात अडकलेला रुग्ण आणि त्याचे नातेवाईक अक्षरशः रडत आहेत.इतके पैसे आणायचे कुठून आणि पैसे उपलब्ध झाले नाही तर डोळ्यासमोर माणसं मरू द्यायची का? या आधी कधीच झाली नसेल इतकी भयंकर अवस्था आज आपल्या सर्वांच्या समोर आहे.हे चित्र अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक आहे.*
*डॉक्टर साहेब माणसं जगली पाहिजे हो!!!..पैसा आज नाही तर उद्या कमावणार आहात तुम्ही परंतु आज ही वेळ नाही…*

*नवऱ्याला कोरोना झाला तर बायको मंगळसूत्र मोडून,घरात आहे तेवढे दाग-दागिने मोडून उपचारासाठी पैसे उभे करत आहे!! लोकं व्याजाने पैसे घेऊन तुम्हाला आणून देत आहे!! तुम्ही बिलं जरूर घ्या…पण डॉक्टर साहेब..गोरगरिबांचं रक्त पिण्याचं काम करू नका…शासनाच्या नियमावलीच पालन करा..थोडंफार समजू शकतो हो..पण 80 ते 90 हजार जास्तीचे मागता हे फार होतं साहेब..तुम्ही सहजपणे सांगता हो.. सव्वा लाख..तीन लाख..पाच लाख लागतील..पण डॉक्टर साहेब, ही लाखाची जुळवाजुळव करताना रुग्णांचे नातेवाईक किती कासावीस झालेले असतात,किती फरफट होते त्यांची याचा अंदाज तुम्हाला नाही!!!…*
*लॉक डाऊन मध्ये सर्व व्यवसाय बंद असल्याने, शेतकरी यांच्या शेतातील मालास भाव नसुन शेतातील भाजीपाला गुरे डाेरे जनावरांना खाऊ घालावा लागत आहे त्यामूळे शेतकरी यांची आर्थीक परीस्थीती फारच अडचणीची आहे आणि परिसरातील उद्योग व्यवसाय जवळ जवळ बंद आहेत.त्याचा मोठा आर्थिक फटका सर्वांनाच बसलेला आहे.त्यामुळे कोरोणाच्या या कठीण काळापुरता तुम्ही तुमचा चष्मा बदला डॉक्टर साहेब….माणसं आहोत आपण*

*तुम्हाला राजाश्रय असेल..अधिकाऱ्यांचं अभय असेल..परंतु साहेब तुमचं उर्वरित आयुष्य फक्त आणि फक्त गोरगरिबांच्या आशीर्वादानेच सुखी,समाधानी आणि निरोगी राहील….हेच आशीर्वाद तुमच्या कामाला येतील हे विसरू नका…लोकांना घाबरवून देऊन आर्थिक संकटात टाकू नका….*

*डॉक्टर साहेब माणसं जगली पाहिजे!!*

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here