Home Covid- 19 खासगी रुग्णालयात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार, गरिबांनी मरायचं का?

खासगी रुग्णालयात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार, गरिबांनी मरायचं का?

48
0

Pratikar News

By-Nilesh Nagrale

16 April 2021

नागपूर : कोरोना रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी रेमेडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. मात्र, हा काळाबाजार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे थेट तक्रार केल्यानंतर एका प्रकरणात रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयाला दम देत रेमडिसिव्हिर उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, अनेक खासगी रुग्णालयात रेमेडेसिव्हिरचा सर्रास काळाबाजार सुरू आहे.

पहिल्या दिवशी ८ हजाराला एक इंजेक्शन विकत घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी याच रेमडेसिव्हिरची किमंत १५ हजार होत आहे. या प्रकरणाची तक्रार मंत्र्यांपासून तर प्रशासनापर्यंत करण्यात येत आहे. मात्र, हा काळाबाजार रोखला जात नाही. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ही खंत सकाळजवळ व्यक्त केली, हे विशेष. अत्यवस्थ कोरोनाबाधिताच्या नातेवाईकाला रेमडेसिव्हिर मिळवण्यासाठी आर्थिक फटका बसत आहे. ११ एप्रिलरोजी २० हजार रुपयांची मागणी केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या एका प्रकरणाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. संबधिताला खडसावले. यानंतर या रुग्णालयाने माफक दरात इंजेक्शन उपलब्ध करून दिले.

काही रुग्णालयातील कर्मचारी रेमडेसिव्हिर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कसे देत आहे, याचा विचार प्रशासनाकडून का केला जात नाही. रुग्णालयातील कर्मचारी थेट ‘आम्ही ब्लॅकमध्ये रेमेडेसिव्हिर मिळवली, तुम्हाला हवी असल्यास २० हजारात एक इंजेक्शन पडेल’ असे सांगतो, हा पैसा आणायचा कुठून? गरीबांनी मरायचं का? हा सवाल गरीबांचा आहे.

मेयोतही रेमडेसिव्हिर देणे थांबले –

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा संपल्याने बऱ्याच रुग्णांना गुरूवारी इंजेक्शन देण्यात आले नाही. गुरुवारी मेयो प्रशासनाला केवळ १०० इंजेक्शन उपलब्ध करण्यात आले. गुरुवारी २०० इंजेक्शनचा पुरवठा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात रुग्णांना इंजेक्शन देण्यात येत नसल्याची चर्चा आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी खाट मिळत नाही. औषधोपचार मिळत नाही. एखाद्या प्रकरणाची दखल घेतली जाते, मात्र रुग्णाला इंजेक्शन सहज उपलब्ध होईल, याचे नियोजन केले जात नाही. रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध करून द्यावा.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here