Home Breaking News कोरोना झालाय दीड लाख तयार ठेवा |When Corona is done, keep one...

कोरोना झालाय दीड लाख तयार ठेवा |When Corona is done, keep one and a half lakh ready

78
0

Pratikar News

Share This News

नागपूर : कोरोनाची वाढती संख्या आणि बेडसोबत आता इलाजासाठी लागणारा खर्च लोकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णाला बेड भेटला तरी औषध आणि इंजेक्शनसाठी तब्बल १.५० लाख कॅश भरावी लागत आहे.
खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल होताच त्याच्या नातेवाइकांना ही रक्कम कॅश भरावी लागत आहे. राज्यातील सर्वच खासगी हॉस्पिटलमध्ये विमाची कॅशलेस सुविधा बंद आहे. त्यामुळे इतकी मोठी रक्कम जुळविण्याची कसरत लोकांना करावी लागत आहे.
कोरोना झाल्यावर रेमडिसिव्हिरसह पोट्र्या, मांडी, छाती आणि नसांमध्ये इंजेक्शन द्यावे लागते. यातील एक एक इंजेक्शन चार ते पाच हजार रुपयांचे आहे. फेबीफ्लू गोळ्या १२०० ते १५०० रुपयांना मिळत आहेत. छातीच्या स्कॅनचा दर २५०० ते ५००० आहे. रक्त चाचण्या ३२०० ते ३९०० दिवसानुसार आहे.
याशिवाय ऐनवेळी काही त्रास वाढल्यास बाहेरून येणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरच्या फी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आता नागपूर विदर्भासह महाराष्ट्रातील लोकांपुढे कोरोना उपचारासाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न आहे. अनेकांनी आपल्या नातेवाइकांना वाचविण्यासाठी घरातील सोने विकले आहे. काहींनी फिक्स मोडले आहेत. काहींनी लहान मुलांच्या नावे असलेले खाऊचे पैसे बाहेर काढले आहे. पण यानंतरही कोरोनाने यातील अनेकांचा प्राण घेतल्याने बहुतांश परिवार खचले आहेत. एका कुटुंबात जर दोन किंवा अधिक कोरोनाबाधित असतील तर त्यांची आर्थिक ओढाताण न बघविणारी अशीच आहे.

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here