Home Breaking News काशीराम ने बामसेफ,बीएसपी स्थापन करून ♦️बाबासाहेब च्या मुळ संघटना नष्ट केल्या…

काशीराम ने बामसेफ,बीएसपी स्थापन करून ♦️बाबासाहेब च्या मुळ संघटना नष्ट केल्या…

57
0

नागपूर…

*कांशीराम हरिसिंह रामदासिया*
✍🏻 *हर्षवर्धन ढोके*

बाबासाहेबांची *SSD,TBSI, RPI* उध्वस्त करुन इथल्या रिपब्लीकन आंबेडकरी लोकांना भावनात्मक करुन स्वत:ची *बामसेफ* आणि नंतर *BSP* स्थापन करुन कांशिरामने बाबासाहेबांच्या विरोधी स्वत:चे अस्तित्व सिद्ध कऱीत बहुजन नावाखाली जातीचे राजकारण कसे केले ! थोडक्यात पाहुया.

ही पोस्ट *युसिडायडीस* या महान तत्वज्ञानाला समर्पीत करण्यात येत आहे. युसिडायिडीस म्हणतो, *”जो जिंदा है उनके प्रती हमे आदर व्यक्त करना चाहीये तथा जो मर गये उनके प्रती हमे सच्चाई का प्रकटावा करना चाहीये।”*
वयाचे 25 वर्षे होवूनही कांशिरामने साधे बाबासाहेबांचे नाव सुद्धा एकले नव्हते. उलट त्या वेळेस (१९६०) बाबासाहेबांचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते. १९३२ च्या राऊंड टेबल काँफरंसने डॉ. भिमराव आंबेडकर हे नाव जगातील सर्व वर्तमान पत्रात झळकले होते.
बाबासाहेबांची *आर.पी.आय.* दोन – तीन भागात विभागली होती ती आर.पी.आय. एकत्र करण्यासाठी कांशिरामने कोनताच प्रयत्न केला नव्हता. (केला असेल तर तसा संदर्भ द्यावा) उलट RPI फुटल्याचा फायदा घेवून बाबासाहेबांच्या *आर.पी.आय.* ला तीलांजली देत संधीचा फायदा घेवून कांशिरामने आपले पगारी *कर्मचारी बामसेफ* संघटन उभारले.

बाबासाहेब म्हणतात, *”आपल्या उत्पन्नाचा विसावा भाग धम्माला दान करा.”* कांशीरामने याचा फायदा घेत बाबासाहेबांच्या *बुद्ध धम्माच्या उत्कर्षासाठी दान करा* या आव्हानाच्या विरोधी जावून स्वत:चे *बामसेफ संघटन आणि BSP* या राजकीय पार्टीसाठी अरबो करोडो रुपये जमा केले. हा हिशोब विचारण्याची कोणत्याच कार्यकर्त्याची कधीच हिम्मत झाली नाही. *दरवर्षी 2.40 करोड रु.जमा व्हायचे. हे स्वत: कांशिराम म्हणतात.*
बाबासाहेबांची *आर.पी.आय.* नष्ट करण्यासाठी कांशीरामने *बामसेफ* (BSP) तर त्यानंतर *The Buddhist Society Of India* नष्ट करण्यासाठी कांशिरामने *’बुद्धिस्ट रिसर्च सेंटर’* ची स्थापना केली तर *’समता सैनिक दल’* नष्ट करण्यासाठी *’युनिव्हर्स फोर्स’* स्थापण केली. बाबासाहेबांचे सर्व संघटन मोडीस काढण्याचा हा प्रयत्न होता आणि त्यात ते यशस्वीही झालेत. आंबेडकरी लोक भावनेत फसलीत. त्याना आज सुद्धा ही जानिव नाही की त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या स्वत:च्या संघटनासाठी नाही तर कांशिरामच्या संघटना चालविण्यासाठी जीवन घालविलेत. यातून ते बरबादही झालेत

कांशिरामने अशा प्रकारे भावनात्मक स्वत:ला आंबेडकरी लोकांसमोर प्रस्तुत केले की, तेच बाबासाहेबांचे सच्चे वारसदार आहेत. बाबासाहेब त्यांनाच कळले. भावनात्मक भाषणातून कांशिरामने बाबासाहेबानंतर स्वत:ला *कांशिराम साहेब* नामकरण करवून घेतले.
कांशिरामची पिलावळ पोट फुगवू -फुगवू सांगतात की, *”Annihilation of caste”*हे बाबासाहेबांचे पुस्तक कांशिराम यानी *10 वेळा* वाचून काढले. या एका पुस्तकाने त्यांना बाबासाहेब समजले असे ते म्हणतात. *एका रात्रीत एकदाच वाचता येणारे हे छोटेसे पुस्तक कांशीरामने दहा वेळा कसे वाचले!* त्याचे त्यांनाच माहीत. येथे आमचे 10 जन्म झाले तरी बाबासाहेबांची महानता कोणी समजू शकत नाही!
एखादे पुस्तक १० वेळा तेव्हा वाचल्या जाते;
१) एकतर एक दोन वाचण्यात ते पुस्तक वाचून समजले नाही.
२) नाहीतर मग जास्तच समजले. कांशिरामने त्या पुस्तकातून उलट केले. त्या पुस्तकात जाती नष्ट करण्याच्या ज्या उपाययोजना बाबासाहेबांनी सांगितल्या त्या एकाही उपाययोजनेवर कांशिरामने काम केले नाही.

मग कशासाठी वाचले दहावेळा ते पुस्तक ?
कांशिरामने त्यातून जाती जोडून राजकारण कसे करता येईल याचा शोध लावला. उत्तरप्रदेशातील अशिक्षित, गरीब चांभार, महार, भंगी आदी कमजोर जाती कांशिरामच्या या षडयंत्रास बळी पडलेत.
या पुस्तकात बाबासाहेब *जाती तोडन्याचा* मार्ग सांगतात. कांशिरामने या पुस्तकाचा उलट फायदा घेवून जाती नाकारून लोकांना *’बुद्ध -धम्म’* देण्याऐवजी जाती कायम ठेवून राजकारण कसे करायचे, हे त्यांच्या कार्यकर्त्याना शिकविले.
म्हणून त्यांनीही शेवटच्या क्षणापर्यंत बौद्ध धर्म स्विकारला नाही आणि *कुणाला स्विकारुही दिला नाही.* शेवटपर्यत महार,मांग,चांभार,माळी या जातीचे राजकारण मत आणि पैशासाठी केले आणि आताही करतच आहे.

जे लोकं पोटाच्या आतड्या सुकडून जे कांशिरामची स्तुती करत हिंडतात, त्यांच्या घरात तांदळाचा एक दाना कधी कांशिराममुळे आला नाही. एकवेळचे हे कार्यकर्ते बाबासाहेब सोडतील पण कांशिरामची विभुतीपूजा करणे सोडणार नाहीत.
कांशिराम भक्तांना जेवढे कांशिराम बद्दल माहीत आहे, तेवढे बाबासाहेबांच्या लेखन भाषणाचे ज्ञान १०% ही माहीत नाही. कांशिराम भक्तांच्या जिभेवर कांशिराम साहब – कांशिराम साहब हे नाव येथे तिथे बाबासाहेब नाव येत नाही. असे लोक खातात बाबासाहेबांचे आणि चाटुगिरी करतात कांशिरामची! असे लोक आतंकवाद्यापेक्षाही बौद्ध समाजाला धोकादायक आहेत. कारण जातीय राजकारणाचा पुरस्कर्ता होते.
वामन मेश्राम, विजय मानकर, माने आदी हे कांशिरामचे पित्तू आहेत. या लोकानी कांशिरामच्या बामसेफ मधून निघून स्वत:च्या पार्ट्या जरी काढल्यात तरी ते कधीच कांशिराम विरोधी बोलत नाहीत. महाराष्ट्राच्या आंबेडकरी लोकांना राजकारणाच्या नावावर याच लोकांनी आर्थिकतेने लुटले आहे.

महान अशी बाबासाहेबांची *रिपब्लीकन* विचारधारा नाकारुन होपलेस बहुजन-मुलनिवासी आणणारे हेच ते लोक आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिणिर्वाणानंतर १९७८ पर्यंत रिपब्लीकन चळवळ होती. बाबासाहेबांचे लोक जे ही आंदोलन करायचे त्याला रिपब्लीकन चळवळ नाव देउन करावयाचे. कांशिरामने रे नाव बदलून बहुजन चळवळ सुरु केली.
यांच्या राजकारणाचा बुद्धाचा *बहुजन शब्दाचा जातीच्या राजकारणाशी तिळमात्र सबंध नाही.* बहुजन – मुलनिवासी हे तत्वज्ञान नसून बाबासाहेबांच्या तत्वज्ञानापासून अनभिज्ञ असनार्या लोकांची पिळवणूक करनारी Policy आहे.

चला, कांशिराम इतर बाबासाहेबांच्या अनुयायांना आणि बाबासाहेबांना काय म्हणतात ते पाहुया.
पँथर विषयी:- *”बाबासाहब के नालायक बच्चे नामांतर की मांग करते है । लेकिन बाबासाहब के लायक बच्चे सत्ता की मांग करते है।”*
जे नामांतर मध्ये शहीद झालेत त्याविषयी कांशिराम म्हणतात, *”नामांतर के लिये शहिद होके हमे गांडू समाज का निर्माण करना नही है |”*

बाबासाहेबांच्या पुना पॅक्ट वर कांशिराम म्हणतात, *”आंबेडकर भारत के अछुतो को अंधकार युग से प्रकाशयुग की और ले जा रहे थे ! किंतु हाय ! यह नही होना था,क्योकी प्रकाश युग मे पहुचने से पहिले अछूत चमचा युग मे फिसलकर भटक गये!”*
पुढे कांशीराम म्हणतात,
*”दलित वर्गो ने चाहे पसंद किया होना हो या ना किया हो किंतू 24 सितंबर 1932 को पुना पॅक्ट ने उन्हे चमचा युग मे धकाल दिया।”*
बाबासाहेबांवर *चमचा युग* तयार करण्याचा हा प्रत्यक्ष आरोप कांशीरामचा होता.

पुढे कांशिराम म्हणतात,
*”इसमेसे सबसे खराब ,नालायक चमचे तयार हुये।”* बाबासाहेबांच्या प्रामाणीक अनुयायांच्या ही थोबकाडीत होती.
कांशिराम पुढे म्हणतात, *”महार लोग अंबेडकर को गांधी के आगे भिकारी साबित कर उन्हे कांग्रेस के आगे विवश करते रहे|”*

बौद्धांचा राग कांशिरामला होता. महाराष्ट्रातील बौद्ध आंबेडकरी चळवळीने कांशिरामच्या समोर शेपुट नाही टाकले, म्हणून नागपुर येथील उंटखाना येथे भाषणात बौद्धाना *40-40 वेळा त्यानी “महार – धेडगे” म्हटले.* याच भाषनात ते बाबासाहेबाना म्हणतात…
*”महाराष्ट के लोगोने बाबासाहब को धक्के मार-मार के बाहर धकाल दिया।मैने उत्तर प्रदेश मे यदी आंबेडकर को लेके नही जाता तो उनका नामो निशान मिट जाता.*

पुढे कांशिराम म्हणतात,
*”पुना करार के बाद बाबासाहेब पापड बेलते रह गये और मैने 11 एम.पी.चुनकर लाये |”*
हा सर्वात मोठा बाबासाहेबांचा अपमान होता.महाराष्ट्रातील बाबांचे लेकरं बाबासाहेबांना खरंच धक्के मारतील! (असा विचार मनात आला तरी कीड़े पडतील) आणि बाबाबासाहेबांची स्थीती इतकी दयनिय झाली होती की कांशिराम त्याना उत्तरप्रदेशात भिकारी म्हणून घेवून गेलेत.
कांशीराम म्हणतात,
*”पढे लिखे लोग बौद्ध नही,जो बुद्धू है वह बौद्ध है!”*-कांशीराम
*”यदी मै आंबेडकर को उत्तर प्रदेश नही लेके जाता तो उनका नामो – निशाण मिट जाता।”*– कांशिराम
*”आप लोगोने अंबेडकर को जुते मारकर अच्छा नही किया | बगैर जुते मारकर ही उनको रफा दफा कर देते।”* – कांशिरामची इतकी औकात झाली आमची की बाबासाहेबाना आम्ही चपला – जुते माराव्यात. अशी कल्पना जरी कुणाच्या मनात आली ,तरी त्याच्या तोंडात किडे पडतील.

“♦️जाती के विनाश के बारेमे मैने सोचना बंद
कर दिया।”* – कांशिराम

♦️ अंबेडकर ने किताबोसे सिखा है;*

* ♦️ लेकीन मैने अपने खुद के जीवन तथा

लोगो से सिखा है |*

♦️ अंबेडकर किताबें जमा करते थे |*

♦️*मैने लोगोंको जमा करने का
प्रयत्नकिया-कांशिराम

बाबासाहेबाना नाकारुन त्यांच्या विरोधात जाउन आम्हाला आमचे बंगले नाही बांधायचे. डॉ. आंबेडकरच्या मार्गावर चालायचे की कांशिरामच्या हा प्रश्न वाचकांवर सोडतोय.

✍ *हर्षवर्धन ढोके*
*संदर्भ :-* ( *चमचा युग,Ambedakar and Kanshiram ,कांशिराम का मायाजाल.*) 2014

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here