Home आपला जिल्हा कोरोना काळात अशी पण एक जयंती ! सर्वांना क्रांतीकारी जयभिम🙏

कोरोना काळात अशी पण एक जयंती ! सर्वांना क्रांतीकारी जयभिम🙏

107
0

Pratikar News

(स्वाती इंदु दयानंद धोंगडे)
बल्लारपुर :आपल्या सर्वांना महिती आहे जगावर कोरोनाचे संकट आले आहे.कित्येक लोकांचे जीव गेले आहेत . त्यामुळे मागच्या वर्षी आपण सर्वानी घरीच जयंती साजरी केली .यावेळेस पण सरकारने निर्बध लावले होते.पण काहि कमि लोकांमध्ये जयंती साजरी करू शकतात बोलले.
कोरोना काळात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे . लोकं रक्तदान करायला भीत आहे त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. रक्ताचा थेंब न् थेंब मनुष्याकरता वरदान – उठा चला करूया रक्तदान या विचाराला अनुसरुन आमच्या सांची बुद्ध विहारात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.त्यात ब-याच लोकांनी रक्तदान केले. या कोरोना काळात सर्वाना सुट्ट्या होत्या मात्र आपले साफसफाई कर्मचारी , कचरा संकलन कर्मचारी , परीचारीका ,फार्मासिस्ट , डॉक्टर , पोलिस हे सर्व लोकं आपल्या जीवाची पर्वा न काम करीत राहिलेत त्यासाठी सर्वांना माझा मनापासून सॅलुट……काल आपल्या बाबाच्या जयंतीदिनी आमच्या परीसरातील कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना काळात अशी पण एक जयंती यशस्वीरित्या पार पडली. या कार्यक्रमाचे आयोजन सांची बुद्ध विहार बल्लारपुर येथील युवक व युवतींनी केले होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सांची बुद्ध विहार बल्लारपुर येथील युवक व युवतींनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली.अशा प्रकारे भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिल २०२१ रोजी साजरी करण्यात आली.
जयभिम 💙जय संविधान

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here