Home आपला जिल्हा * चिंचोली ( बू ) येथील प्रस्तावित विद्युत उपकेंद्र सुरु करावे ...

* चिंचोली ( बू ) येथील प्रस्तावित विद्युत उपकेंद्र सुरु करावे * भाजपा नेते शंकर धनवलकर यांचेसह गावकऱ्यांची मागणी

81
0
  1. *

    चिंचोली   येथील प्रस्तावित विद्युत उपकेंद्र सुरु करावे

    * भाजपा नेते शंकर धनवलकर यांचेसह गावकऱ्यांची मागणी

राजुरा, वार्ताहर –
राजुरा तालुक्यातील चिंचोली बूज. येथील प्रस्तावित असलेल्या विद्युत उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी भाजपाच्या ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष शंकर धनवलकर, सरपंच पिलाजी भोंगळे, उपसरपंच पुष्पांजली धनवलकर यांचेसह ग्रामपंचायत सदस्य व गावकर्‍यांनी विद्युत मंडळाचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता यांचेकडे केली आहे.
चिंचोली येथे विद्युत उपकेंद्र व्हावे, अशी मागणी असल्याने तत्कालीन युती सरकारने या भागात सात उपकेंद्र मंजूर केले होते. त्यात चिंचोली केंद्राचा समावेश होता. त्यावेळी केंद्र मंजूर असतानाही ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून न दिल्याने अखेर हे विद्युत उपकेंद्र होऊ शकले नाही. आता वीस वर्षानंतर प्रथमच गैरकॉँग्रेसी असलेली भाजप व शेतकरी संघटना समर्थित ग्रामपंचायत निवडून आली आहे. त्यांनी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे ठरवून विद्युत उपकेंद्रांची रीतसर मागणी केली आहे.
चिंचोली येथे अनेक वर्षापासुन विजेचा अपुरा पुरवठा होत आहे. येथे विद्युत प्रवाह व विद्युत जोडणी असल्या तरी नेहमी कमी विद्युत दाब असल्याने नेहमी लाइट डिम राहते. गेल्या वर्षभरात अनेक लोकांचे टीव्ही संच,पंखे, ट्यूबलाइट,बल्ब जळून गेले आहेत. गावातील विशेषता इंदिरानगर,वार्ड क्रमांक तीन येथे ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे. या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, माध्यमिक शाळा व हायस्कूल आणि वसतिगृह असून परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.
चिंचोली येथील प्रस्तावित विद्युत केंद्र विद्युत विभागाने तातडीने निर्णय घेवून सुरू करून पुरेश्या विद्युत दाबाची वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपा ओबीसी आघाडीचे राजुरा तालुकाध्यक्ष व शेतकरी सल्लागार समिती (आत्मा)चे सदस्य शंकर धनवलकर, चिंचोली सरपंच पिलाजी पाटील भोंगळे, उपसरपंच पुष्पांजली धनवलकर, ग्रा.पं.सदस्य वंदना खोब्रागडे,सरिता हजारे,भास्कर घोडमारे यांच्यासह सुभाष धनवलकर,बापूजी डाहूले, गणेश बोडे,मारोती डाहुले, अशोक जुलमे,मनोहर डाहूले, राजू लिंगे,योगेश भोंगळे, सुधाकर घोडमारे,अशोक वाटेकर,आशिष बावणे,नामदेव बोटरे,पंकज अस्वले,बंडू हजारे,परशुराम मडावी,मारोती तुमराम,जगदीश लोडे,अनिल पोहनकर यांनी वीज मंडळाचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता यांचेकडे केली आहे.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here