Pratikar News
एप्रिल १४, २०२१
चंद्रपूर – शहरातील वैदिशा शेरेकर या अडीच वर्षाच्या चिमुकलीने आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करीत अवघ्या काही दिवसांतच तब्बल 200 देशांची राजधानी व राष्ट्रीय ध्वज पाठ करीत अचूकपणे सांगते, तिच्या या बुद्धीचा गौरव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान मिळविल्यानंतर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवीत जागतिक पातळीवर गौरव प्राप्त केला.
चंद्रपूर येथील बँक ऑफ इंडिया शाखा पद्मापूर येथे सहायक व्यवस्थापक म्हणून वैदिशा चे वडील वैभव शेरेकर हे कार्यरत आहे, वैदिशा त्यांची एकुलती एक मुलगी असून वैदिशा ही वयाच्या 1 वर्षांपासूनचं लहान गोष्ट सुद्धा आठवण ठेवत असे.
तिच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर व्हावा म्हणून वैदिशाच्या आईने दीपाली शेरेकर यांनी लहान पणापासून सर्व देशांच्या राजधानी, राष्ट्रीय ध्वज यांची शिकवण सुरू केली होती त्यामुळे आज वैदिशा ने जागतिक पातळीवर नाव मोठे केले.
इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड नंतर आता वैदिशा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ध्येय गाठण्याच्या दिशेने तयारी करीत आहे.
लहान वयातच वैदिशाने दोन मोठे प्रतिष्ठित सन्मान प्राप्त करून शेरेकर परिवाराचे नाव जागतिक पातळीवर नेले असून तिच्या या नेत्रदीपक यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post Views:
58