प्रतिकार न्युज नेटवर्क
विशेष संपादकीय✍️✍️✍️✍️
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो.
हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला ‘समता दिन’ म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करतात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यातसाजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या
बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील १०० पेक्षा अधिक देशांत आंबेडकर जयंती साजरी केली जाते
नवी दिल्ली, भारतीय संसदेमध्ये त्यांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देतात. भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा मुर्तीला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात. दलितेतर लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत व त्यांनी एकूण ३२ पदव्या मिळवलेल्या आहेत.
इ.स. २००४ मध्ये, कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या टॉप १०० विद्वानांची यादी तयार केली होती त्यात पहिलेनाव ‘डॉ. भीमराव आंबेडकर’ हे होते. विद्यापीठाने त्यांचा उल्लेख आधुनिक भारताचे जनक असा केला होता.
इ.स. २०११ मध्ये, इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांवर केलेल्या संशोधननानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानक्षेत्रांतील तब्बल ६४ विषयांचा गाढा अभ्यास (मास्टरी) होता, जगाताच्या इतिहासात अन्य कुणाचेही एवढ्या विषयांत प्रभुत्व नव्हते….!!!
बोध्दिसत्व , प्रज्ञासुर्य , परमपुज्य , क्रांतीसुर्य , त्यागपुरूष , कायदेपंडीत , भारतिय घटनेचे शिल्पकार , महामानव , युगपुरूष , विधवान , शिलवान, अर्थतज्ञ , भारत भाग्य विधाता, विश्वरत्न , डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻