Home Breaking News कर्जमाफी योजनेपासून 90 शेतकरी वंचित,,, सततची नापिकी, आणि कर्जबाजारी पणात बेहाल

कर्जमाफी योजनेपासून 90 शेतकरी वंचित,,, सततची नापिकी, आणि कर्जबाजारी पणात बेहाल

236
0

तोहोगाव…

 

कर्जमाफी योजनेपासून 90 शेतकरी वंचित,,,

सततची नापिकी, आणि कर्जबाजारी पणात बेहाल

राजुरा ,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-
तोहोगाव येथील 90 शेतकऱयांनी रीतसर अर्ज केल्यानंतर पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड संताप व्यक्त होत असून कोरोना लाकडाऊन,सततची नापिकी,कर्जाचा डोंगर,नवीन कर्ज देण्यास बँकेचा नकार अश्या विवेचनात ग्रस्त झाले असून जगू की मरू असा शासनास प्रश्न विचारीत आक्रोश करीत आहेत
शेतीपीक करिता गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथील सेवा सहकारी संस्थे मार्फत बर्याच शेतकऱयांनी कर्ज घेतले काही शेतकरी नियमित कर्ज योजनेचा लाभ घेतला परंतु सतत च्या नापिकीमुले बहुतांश शेतकऱयांनी कर्ज भरणा केला नाही दरवर्षी निसर्गाच्या लहरिपणात शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असल्याने कर्ज थकीत राहत आहे कर्जाची परतफेड कशी करायची या विवेचनात असतानाच तत्कालीन युती शासनाने,आणि विद्यमान आघाडी सरकारने ही शेतकरी कर्जमाफी जाहीर केली मोठ्या आनंदाने शेतकऱयांनी कर्ज माफीचा रीतसर अर्ज भरलेत आणि कर्ज माफ होणारच अश्या आशेवर शेतकरी होते
परंतु शासकीय घोडचूक ,अधिकार्याचे दुर्लक्षित बेजबाबदारपणा यामुळे शेकडो शेतकरी या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित झाले आहे याबाबत वंचित शेतकऱयांनी संभडीत बँक अधिकारी ,सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांचेकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देत हाकलून देत आहेत दरम्यान लोकलेखा समीतीचे प्रमुख तथा आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे मार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री,सहकारमंत्री,जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात असले आहे
अगोदरच कोरोना संकट,सततची नापिकी,आणि कर्जाचा डोंगर वाढत आहे आणि पात्र असतानाही कर्जमाफी पासून वंचित झाल्याने शेतकरी हतबल होऊन जगू की मरू असा प्रश्न शासन दरबारी मांडीत आहे आतातरी शासनाने दखल घेऊन तात्काळ न्याय देण्याची मागणी केली आहे
याविषयी अधिक प्रतिक्रिया देताना किशोर कासनगोट्टूवार,पांडुरंग भगत, केतन गौरकार,संदीप मोरे..

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here