सिंडेवाही…..
♦️प्रतिनिधी ..सुनील घाटे…..
♦️सिंदेवाही तालुक्यातील अवैध धंदे बंद करा —–
शिवसेने ची मागणी
सिंदेवाही तालुक्यातील अवैध दारुविक्रीसह सामाजिक स्वास्थास अपायकारक असलेल्या सुगंधित तंबाखू सट्टा आणि गांजा सारख्या अवैध धंद्यांवर आवर घालन्याबाबत आज देवेन्द्र मंडलवार शिवसेना तालुका प्रमुख सिंदेवाही यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार निशिकांत रामटेके यांना निवेदन देण्यात आले ,
सिंदेवाही तालुक्यात सर्वत्र सर्रासपणे खुलेआम दारू , सुगंधित तंबाखू , आणि गांजा मिळत असून असून सामाजिक स्वास्थास अपायकारक असलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखाची सुद्धा सर्रास विक्री होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूविक्रीवर बंदी असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना यंत्रणेला पुरेसे यश आले नाही. त्यामुळेच की काय सिंदेवाही तालुक्याच्या प्रत्येक मुख्य भागात दारूची सर्रास विक्री होत आहे. शिवाय अशा अवैध दारूविक्रीसाठी शालेय मुलांसह महाविद्यालयीन मुलांचा वापर होत असल्याने सामाजिक वातावरण दूषित होण्याचा धोका बळावला आहे.
कोविड १९ च्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गुटखा, सुगंधित तंबाखावर बंदी लादली असताना सिंदेवाही तालुक्यात सुगंधित तंबाखाची सर्रास विक्री होत आहे. याबाबतची पुरेपूर कल्पना स्थानिक पोलीस प्रशासनालाही आहे. पण प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची मानसिकता नसल्याने दारू आणि तंबाखू विक्रेते कोणत्याही भयाविना खुलेआम अपायकारक वस्तूच्या विक्रीत मग्न आहेत.
दारू आणि सुगंधित तंबाखूसह तालुक्यात सर्वस्त्र खुलेआम चालणाऱ्या सटट्यावर आणि आता सध्या सिंदेवाही तालुक्यात गांजा नावाचे जहर मोठ्या प्रमाणावर आपले पाय पसरवत असून तालुक्यातील युवा याच्या जाळ्यात अडकत आहेत या सर्व अवैध धंद्याना वेळीच पायबंद न घातल्यास शिवसेना तालुका शाखेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा ईशाराही तालुका प्रमुख देवेन्द्र मंडलवार यांनी दिला .
तालुका प्रमुख देवेन्द्र मंडलवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनाच्या शिष्टमंडळात कचेपार येथील शाखा प्रमुख आशिष सरपाते , टेकरी येथील शाखा प्रमुख कृष्णा मेश्राम , युवासेना शाखा प्रमुख घनशाम बोरकर , परीक्षित गजभे , महेश कावळे , रणजित सोनटक्के , नलेश्वर शाखांप्रमुख मेघशाम ढोक , इटोली शाखाप्रमुख शँकर नर्मलवार , तसेच शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते ,