Home Covid- 19 विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ता, आंदोलन, चळवळीतला एक हर हुन्नरी कलाकार, कार्यकर्ता Vira Sathidar...

विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ता, आंदोलन, चळवळीतला एक हर हुन्नरी कलाकार, कार्यकर्ता Vira Sathidar आज आपल्यातून निघून गेले …

62
0

नागपूर…

एक, दिलदार, मित्र हरपला वीरा साथीदार
————————————–

कोर्ट_चित्रपटातील #नारायण_कांबळेंची एक्झिट
अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कोर्ट चित्रपटाचे प्रमुख अभिनेता आणि विद्रोही आंबेडकरी बंडखोर कार्यकर्ता म्हणून त्यांचे व्यक्तित्व होते.

 

विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ता, आंदोलन, चळवळीतला एक हर हुन्नरी कलाकार, कार्यकर्ता Vira Sathidar आज आपल्यातून निघून गेले .
वर्धा जिल्ह्यातील एका खेड्यात अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या वीरा यांनी त्यांचे आयुष्य संघर्षात घालविले. नागपूरला कामासाठी आलेल्या वीरा यांचे नाते आंबेडकरी चळवळीशी जुळले. शेकडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

प्रसिद्ध “कोर्ट ” सिनेमा ला, सिनेमा मधील जागतिक सर्वोच्च पारितोषिक “ऑस्कर ” साठी नॉमिनेशन मिळाले होते या मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर नागपूर एम्स उपचार सुरु असताना वीरा साथीदार यांची प्राणज्योत मालवली.

मात्र अभिनेता म्हणवून घेण्यापेक्षा आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणे त्यांना आवडायचे. त्यांच्या अचानक निधनाने चळवळीचा विद्रोही आणि लढाऊ कार्यकर्ता हरवला.सांविधान चौकातील चहा च्या टपरीवर तास तास भर चर्चा,होत असत अनेक, आठवणी आहेत तुझ्या सोबत परत तुला निळा सलाम, करून
आंबेडकराईट, मुव्हमेंट कल्चर अॅन्ड लिटरेचर, या, संस्था च्या, वतीने भावपुर्ण श्रध्दांजली🌹🌹

. संकलन
@राजन, वाघमारे……

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here