Home राजकारण धिडशी सरपंच व सदस्यांचा अँड.वामनराव चटप यांचे हस्ते सत्कार संपन्न ….

धिडशी सरपंच व सदस्यांचा अँड.वामनराव चटप यांचे हस्ते सत्कार संपन्न ….

89
0

* धिडशी सरपंच व सदस्यांचा अँड.वामनराव चटप यांचे हस्ते सत्कार

राजुरा, तालुका प्रतिनिधी –
राजुरा तालुक्यातील धिडशी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप यांचे हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कवडू पोटे, शेतकरी संघटना तालुका प्रमुख शेषराव बोंडे, युवा आघाडी प्रमुख कपिल इद्दे, नगरसेवक मधुकर चिंचोळकर माजी सरपंच व बाजार समिती उपसभापती दत्तुजी ढोके,गुरुदेव सेवा मंडळाचे अमरनाथ जीवतोडे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सरपंच कु. रिता बंडू हनुमंते, उपसरपंच राहुल सपाट, ग्रामपंचायत सदस्य विनोद कोरडे, बंडू काकडे, सौ.माया जीवतोडे, सौ.गीता ढोके, सौ.सिंधुताई नीखाडे या सात नवनिर्वाचितांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बोलतांना अँड.वामनराव चटप म्हणाले की, गावकर्‍यांनी एकजुट करून व सर्वांशी विचारविमर्श करून गावाचा विकास साधला पाहिजे. आपल्या गावातील सर्व नागरिकांना ग्रामपंचायत द्वारे सोईसुविधांचा लाभ विनासायास मिळेल, याची खबरदारी पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील आदर्श गाव घडविण्यासाठी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पक्षभेद विसरून प्रयत्न करावे,असे मत अँड. चटप यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉ. नानाजी काकडे, उद्धव सपाट, राजू वऱ्हाटे, महादेव काकडे, भाऊराव जीवतोडे, बंडू हनुमंते, ग्रा.पं.सचिव यांचेसह अनेक नागरिक उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here