बल्लारपूर
येथील माउंट फोर्ड च्या आय टी आय कार्यालयात घुसलेल्या रान डुक्कराला बल्लारपूर वन कर्मचाऱयांनी केले जेरबंद,सुदैवाने कुणालाही इजा नाही
राजुरा, चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-
आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास बल्लारपूर येथील माउंट फोर्ट येथील परिसरात अचानकपणे एक मोठे रानटी डुक्कर आल्याने कर्मचाऱयांनी त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात चक्क आयटीआय च्या मुख्य कार्यालयातच हे डुक्कर शिरल्याने चांगलीच धावपळ झाली लगेच बल्लारपूर येथील वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना माहिती देण्यात आली माहिती मिळताच क्षेत्र सहायक नरेश भोवरे,क्षेत्रसाहायक प्रवीण विरुटकर ,वनपाल मनोज टेकाम,वनरक्षक संजय सुरवसे ,आणि वनमजूर घटनास्थळी पोहचून विशेष मोहीम सुरू केली अखेर तीन तासानंतर कार्यालयात शिरलेल्या रानटी डुक्कराला मोठ्या प्रयत्नानी जेरबंद करण्यात यश आले आली सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला यावेळी रानटी डुक्कर किरकोळ जखमी असल्याने लगेच पिंजर्यात बंदिस्त करून पशु वैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात येत आहे उपचारानंतर त्याला सुरक्षित रित्या जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहीती वन अधिकाऱयांनी दिली
वन कर्मचाऱ्याच्या सतत प्रयत्नात डुक्कर जेरबंद करण्यात आले सुदैवाने मात्र कोणतीही अनुचित घटना घडली नाही त्यामुळे वन कर्मचार्याची अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रतिकार न्यूज