Home Breaking News कापूस खरेदीसाठी सीसीआय ची 100, ♦️आणि फेडरेशनची60 केंद्र सुरू करावी ..♦️महाराष्ट्र शेतकरी...

कापूस खरेदीसाठी सीसीआय ची 100, ♦️आणि फेडरेशनची60 केंद्र सुरू करावी ..♦️महाराष्ट्र शेतकरी संघटना.

54
0

राजुरा….
प्रतिकार …

♦️ महाराष्ट्रात कापूस खरेदीसाठी सीसीआयची १००

आणि फेडरेशनची ६० केंद्रे सुरू करावी

♦️ महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी

राजुरा, ९ऑक्टो.( ता. प्र.) –
केंद्र सरकारच्या भारतीय कापूस महामंडळाने ( सीसीआय ) चालू हंगामाकरिता महाराष्ट्रातील २० कापूस उत्पादक जिल्ह्याकरिता केवळ ६४ कापूस संकलन केंद्रे मंजूर केलेली आहेत. ही कापूस संकलन केंद्रांची संख्या अतिशय कमी असून ही खरेदी केंद्रे वाढवून १०० करावी आणि राज्य सरकारच्या महाराष्ट्र कापूस उत्पादक महासंघाने (फेडरेशनने) राज्यात केवळ तीस केंद्रांना मंजुरी प्रदान केली आहे. या केंद्राची संख्या ३० ने वाढवून ६० कापूस संकलन केंद्रे सुरू करावी,अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेे केली आहे.
सीसीआयच्या व्यवस्थापकीय संचालकांनी राज्यात ६४ कापूस संकलन केंद्रे मंजूर केले आहेत. या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व वरोरा या दोन केंद्रांचा समावेश नाही. या यादीत केवळ राजुरा व भद्रावती या दोनच खरेदी केंद्रांचा समावेश असून ही जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी बाब आहे. म्हणून वरोरा व कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी ठरावाद्वारे ही केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे तसेच शेतकरी संघटनेनेही व्यवस्थापकीय संचालक सीसीआय व पणन संचालक,महाराष्ट्र शासन यांचेकडे ही केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे. राज्यात सीसीआयची वरोरा व कोरपना सह ३६ संकलन केंद्रे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता सीसीआयने तातडीने मंजुरी प्रदान करून दसऱ्यापासून सुरू करण्याची मागणी करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र कापूस उत्पादक फेडरेशनने सध्या 30 केंद्रांनाच मंजुरी प्रदान केलेली आहे. या केंद्राच्या यादीत चंद्रपूर व गोंडपिपरी या केंद्राचा समावेश नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे चंद्रपूर व गोंडपीपरी सह कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाची आधारभूत किंमतीने खरेदी होण्याचे दृष्टीने परत ३० केंद्रे वाढवण्याची गरज आहे. म्हणून ती केंद्रे वाढवण्याचा निर्णय घ्यावा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा कापूस किमान वैधानिक किमती ( एमएसपी ) नुसार खरेदी करण्याची दसऱ्यापासून व्यवस्था करावी. त्याकरीता महाराष्ट्रात सीसीआयची ३६ नवी केंद्र व फेडरेशनची ३० नव्या केंद्रांना मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचेे ज्येष्ठ नेते माजी आमदार वामनराव चटप, प्रांताध्यक्ष अनिल घनवट, माजी आमदार सरोज काशीकर, शैला देशपांडे,गीता खांडेभराड,सीमा नरोडे,अंजली पातुरकर,गुणवंत हंगरगेकर,सतीश दाणी,कैलाश तंवार,संजय कोले,तुकाराम निरगुडे,राम नेवले,रामचंद्र बापू पाटील,मदन कामडे,मधुसूदन हरणे,जगदीश बोंडे, ललित बहाळे,सुधीर बिंदू, कडूअप्पा पाटील,शशिकांत भदाणे,विजय निवल, दामोदर शर्मा, गोविंद जोशी, डॉ.आप्पासाहेब पाटील, प्रभाकर दिवे,वामनराव जाधव, वामनराव जाधव या राज्यातील शेतकरी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here