Home Breaking News महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाचे आद्म प्रवर्तक : महात्मा जोतिबा फुले...

महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाचे आद्म प्रवर्तक : महात्मा जोतिबा फुले यांची ११ एप्रिल जयंती दिनानिमित्ताने…..*

79
0

महात्मा ज्योतिबा फुले

*स्त्री शिक्षणाचे आद्म प्रवर्तक : महात्मा जोतिबा फुले*

*११ एप्रिल जयंती दिनानिमित्ताने…..*

‘महात्मा जोतिबा फुले’ हे नाव उच्चारातच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते जोतिबांचे बहुआयामी व्यक्तीमत्व. आद्म समाजसुधारक, शिक्षणमहर्षी, स्त्री शिक्षणाचे आद्म पुरस्कर्ते, लेखक, अशा कितीतरी बहुअंगानी संपन्न असे महात्मा फुले यांचे चरित्र.

*विद्मेविना मति गेली । मती विना नीती गेली ।*
*नीतीविना गती गेली । गती विना वित्त गेले ।*
*वित्तविना शुद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्मेने केले।*’

हा विचार मांडून शिक्षण प्रसाराचा श्रीगणेशा करणारे आद्य समाज सुधारक.

महात्मा जोतिबां फुले यांच्या काळात समाजाची स्थिती अत्यंत दयनीय होती. महाराष्ट्रातील समाज हा अंधश्रध्दा, अनिष्ट रुढी, परंपरा, कर्मकांड या सारख्या समाजविघातक प्रथांनी भरडून गेला होता. स्त्रीयांची परिस्थीती तर पशुतुल्य झाली होती. स्त्रीयांना फक्त ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरतेच मर्यादित ठेवले होते. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांची स्थिती प्रकाशाला घाबरणाऱ्या दिवाभीताप्रमाणे झाली होती. फुलेंना दुरदृष्टी होती, त्यांच्या मते समाजात बदल घडवायचा असेल तर स्त्रीशिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे, त्या शिवाय अज्ञान दुर होणार नाही.

*त्या करिता त्यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये भिडे वाड्यात सुरु केली.*

यासाठी त्यांना सदाशिव गावंडे, सखाराम परांजपे, केशव भवाळकर, या मित्रांचे सहकार्य लाभले. त्याच प्रमाणे वेताळपेठेत शाळा उघडली. या बाबींमुळे त्यांना जाती बहिष्काराचे दडपण सहन करावे लागले.जिवलग नातेवाईकांचा त्यांना विरोध होत असे. विरोधी परिस्थीती निर्माण झाली तरी महात्मा फुले किंचीतही डगमगले नाही. त्यांनी आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. समस्या, संकटे यावर मात करत अविरत झगडत राहिले.मुलींना शिकविण्यासाठी सहजासहजी शिक्षक उपलब्ध होत नसे. अशा वेळी त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई हिला घरीच शिक्षण देणे सुरु केले आणि त्यांनी घरीच महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका घडवली.
भारताच्या इतिहासात सावित्रीबाईचे नाव आद्म सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. समाजाची परिस्थिती सुधारावयाची असेल तर त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे त्यांनी आग्रहाने सांगितले आहे.

अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण प्रसार करणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांना समाज दीर्घकाळ स्मरणात ठेवणार यात तिळमात्र शंका नाही.

अशा पूजनीय जेष्ठ समाजसुधारकास, त्यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र
अभिवादन!!!!!!

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here