राजुरा…
* जीवनशैलीत सकारात्मक बदल आवश्यक – डॉ. नंदा वैद्य
* जेसीआय राजुरा रॉयल्स द्वारा निशुल्क मधुमेह तपासणी
राजुरा, वार्ताहर –
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दिनांक 7 एप्रिलला जेसीआय राजुरा रॉयल्स द्वारे बल्लारपूर येथील डॉ. नंदा वैद्य यांच्या क्लिनिक मध्ये निशुल्क मधुमेह तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला.
या शिबिराचे उद्घाटन सत्रात बोलतांना डॉ. नंदा वैद्य (BAMS) म्हणाल्या की, आपल्या देशात मधुमेहाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण असून आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी आणि आपली जीवनशैली या मुळे मोठ्या प्रमाणात मधुमेहचे रुग्ण वाढत आहेत. परंतु मधुमेह झाल्यास घाबरून न जाता योग्य उपचार व जीवनशैलीत सकारात्मक बदल केले तर तो आटोक्यात राहू शकतो. यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या मनाची योग्य तयारी करून शरीराला व एकंदरीत जीवनात बदल घडवून आणले पाहिजेत. यावेळी डॉक्टरांनी मधुमेहावर उपचार पद्धती आणि मधुमेह टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
जेसीआय राजुरा रॉयल्सच्या अध्यक्ष स्मृती व्यवहारे म्हणाल्या की, सध्या कोविद 19 ची परिस्थिती पुन्हा गंभीर होत असून मधुमेह व अन्य आजार असणार्या व्यक्तींनी अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. शासनाने सुरू केलेल्या लसीकरण केंद्रात जाऊन 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शिबिराच्या आयोजक मनीषा पून व रोहिणी गुडेकर यांनी सर्वानी कोरोना काळात शासकीय नियमांचे पालन करीत सोशल डिस्टन्स चे नियम पाळून मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे, असे सांगितले. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन अँड. मंजू गौतम व आभार प्रदर्शन सचिव सुशीला पोरेड्डीवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेसीआय राजुरा रॉयल्सच्या अध्यक्षा जेसी स्मृती व्यवहारे, माजी अध्यक्षा जेसी सुषमा शुक्ला, जेसी जयश्री शेंडे, जेसी सुशिला पोरेड्डीवार, अँड.मंजू गौतम, जेसी रेखा बोढे, जेसी मधूस्मिता पाढी, जेसी मनीषा पून, जेसी प्रफुल्ला धोपटे, जेसी ज्योती मेडपल्लीवार, राधा विरमलवार, स्वरूपा झंवर, आशा चंदेल, कविता कुमार, श्यामा बेलसरे, प्रतिमा ठाकूर, रोहिणी गुडेकर यांनी योगदान दिले.
प्रतिकार न्यूज