Home आपला जिल्हा महात्मा फुले यांचे आदर्श आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे – सौ. राखी संजय...

महात्मा फुले यांचे आदर्श आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे – सौ. राखी संजय कंचर्लावार, महापौर

17
0

Pratikar News

चंद्रपूर – सत्यशोधक समाजाचे संस्थापक व महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे विचारवंत व थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजी निमित्य चंद्रपूर महानगरपालिकेत सकाळी ११.०० वाजता मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी महापौर म्हणाल्या नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व महात्मा जोतिबा फुले होते. स्त्री व पुरुष यांच्यात भेदभाव न करता सर्वांनी एका कुटुंबाप्रमाणे, एकमताने सत्यवर्तन करून राहिले पाहिजे, असे त्यांचे विचार होते, महात्मा फुले यांचे आदर्श आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
या प्रसंगी मनपा चे सभापती स्थायी समिती श्री. रवी आसवानी, नगरसेवक श्री. संजय कंचर्लावार, व मनपाचे श्री. कवडू नेहारे, विकास दानव उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here