Home Breaking News कोरोनाविरूध्द जिल्हाभरात “विकेंड लॉकडाऊन”

कोरोनाविरूध्द जिल्हाभरात “विकेंड लॉकडाऊन”

58
0

Pratikar News

(प्रतिकार न्यूज नेटवर्क ) निलेश नगराळे 
चंद्रपूर:- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहीमअंतर्गत पुकारलेला ‘विकेंड लॉकडाऊन’ शुक्रवारी (दि. ९) रात्री ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे अथवा फिरण्यास कलम १४४ अन्वये प्रतिबंध घालण्यात आला. हा ‘विकेंड लॉकडाऊन’ सोमवारी सकाळी ७ वाजता संपणार आहे.
 
‘विकेंड लॉकडाऊन’ कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस चिंतेत भर घालणारी ठरत आहे.
 
त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहीम स्वीकारली. या मोहिमेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी ५ एप्रिल रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
 
     अंमलबजावणीसाठी चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आज आढावा घेतला. जिल्हाभरात पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. बंदोबस्तासाठी चंद्रपूर मनपा क्षेत्र व तालुकास्थळी वर्दळीच्या जागा निश्चित केल्या आहेत.
 
 
काय बंद आणि काय सुरू राहणार?…
रूग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, औषध दुकाने, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा. किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था टॅक्सी, ऑटो रिक्षा, माल वाहतूक, शेतीसंबंधित सेवा, वृत्तपत्र आदी आवश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
 
दोन दिवस फक्त घरपोच पार्सल सेवा….
 
हॉटेलच्या आवारातील रेस्टॉरंट वगळता सर्व रेस्टॉरंट बंद राहतील. शनिवार व रविवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत फक्त घरपोच पार्सल सेवा सुरू राहिल. सेवा देणाऱ्या कामगारांनी लसीकरण व निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर एक हजार दंड व आस्थापनेवर १० हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
 
खासगी वाहतूक रात्री आठ पर्यंतच…..
 
खासगी वाहने व बस सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत सुरू राहतील. मात्र, अत्यावश्यक सेवा व निकडीच्या वेळी उर्वरित कालावधीसाठी परवानगी आहे. या चालकांनाही लसीकरण किंवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्टचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
ऑक्सिजन ग्राहकांसाठी नवी अट….
 
सर्व औद्योगिक आस्थापनांना आजपासून ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरता येणार नाही. प्राधिकाऱ्याकडून पूर्व परवानगी आवश्यक आहे. सर्व ऑक्सिजन उत्पादकांनी उत्पादनापैकी ८० टक्के ऑक्सिजन साठा हा वैद्यकीय व औषधनिर्माणासाठी राखीव ठेवावा लागणार आहे.
आजपासून ऑटो रिक्षांवर निर्बंध……
ऑटो रिक्षामध्ये चालक अधिक २ प्रवासी, टॅक्सी चारचाकी वाहन-चालक वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के किंवा आरटीओ नियमानुसार सर्व बसण्याच्या जागा असतील इतकेच प्रवासी नेण्यास परवानगी आहे. लसीकरण पूर्ण होईलपर्यत १५ दिवसांसाठी वैध असलेला कोरोना चाचणी प्रमाणपत्र स्वत:जवळ ठेवावा लागणार असल्याने ऑटोचालक अडचणीत येणार आहेत.
२१०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात……
 
जिल्ह्यात बंदोबस्तासाठी १६० अधिकारी, दोन हजार १०० पोलीस आणि ३५० गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.
असा असेल ‘विकेंड लॉकडाऊन’….
सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यत, ५ पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरणे व जमा होण्यास प्रतिबंध आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत आणि शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजतापर्यंत विनाकारण फिरण्यास मनाई आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here