Home Breaking News हिंगणघाट येथील दालमिल मधील तुरीची दाळ चोरण्याऱ्यास अटक , 6,35,000...

हिंगणघाट येथील दालमिल मधील तुरीची दाळ चोरण्याऱ्यास अटक , 6,35,000 रू चा माल जप्त , डी.बी. पथकाची कार्यवाही..

48
0

हिंगणघाट येथील दालमिल मधील तुरीची दाळ चोरण्याऱ्यास अटक ,

6,35,000 रू चा माल जप्त , डी.बी. पथकाची कार्यवाही..

हिंगणघाट:
दिनांक 04/04/2021 रोजी पोस्टे ला फिर्यादी नामे सुरज महेशकुमार मोटवाणी रा . गुरूनानक वार्ड , हिंगणघाट यांनी रिपोर्ट दिला कि , त्याची आजती येथे असलेली गोविंद ॲग्रो इन्डस्ट्रिज , दालमिल मध्ये ठेवलेल्या तुरीच्या दाळीचे 50 किलो चे 25 चुंगडया एकुण किमंत 1,25,000 रू चा माल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला आहे . अशा तक्रारीवरून पोस्टे ला अप क्र . 340/2021 कलम 380 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . सदर गुन्हा दाखल होताच पोस्टे हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रथक प्रमुख पो.हवा . शेखर डोंगरे व त्यांच्या पथकासह हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन आरोपी व चोरीस गेलेल्या मालाबाबत शोध घेतला असता , फिर्यादीच्या दालमिल मध्ये काम करणारे लेबर यांची कसुन चौकशी केली असता तपासात निष्पन्न झाले कि , फिर्यादीचे दालमिल येथुन दालमिल मधील मजुर मागील काही दिवसापासुन हिंगणघाट येथील काही लोकांच्या संपर्कात येवुन दाळीची विक्री करीत आहे . त्याबाबत तपास केला असता दालमिल येथील मजुर ( आरोपी ) नामे 1 ) शिवनंन्दी हरीप्रसाद कनोजिया वय 20 वर्षे रा . छिंदवाडा , मध्य प्रदेश 2 ) रवि एकनाथ माहुरे वय 26 वर्षे रा . चंद्रपुर व त्याचे सोबत हिंगणघाट येथे राहणारा वाहन चालक / मालक नामे 3 ) प्रज्वल अशोक पितळे वय 20 वर्षे रा . संत ज्ञानेश्वर वार्ड , हिंगणघाट यांनी संगणमत करून दालमिल येथुन तुरीच्या दाळीची चोरी केल्याने त्यांना अटक करून त्यांचा पि.सि.आर घेण्यात आला . पि.सि.आर. मध्ये तपासात निष्पन्न झाले कि , त्यांनी यापुर्वी सुद्धा दोन वेळा तुरीच्या दाळीची चोरी केली आहे असे उघड झाले . तसेच तीनही अटक आरोपी हे दालमिल येथुन तुरीच्या दाळीची चोरी करून हिंगणघाट येथे राहणारा आरोपी क्र .4 ) शेर अली सय्यद वय 34 वर्षे रा . हिंगणघाट यास विकली आहे . त्यावरून चोरीची दाळ विकत घेणारा आरोपी क्र यास गुन्हयात अटक करून यातील चारही आरोपीतांकडुन गुन्हयात चोरीस गेलेला संपुर्ण माल एकुण 37 तुरीच्या दाळीच्या चंगुडया व गुन्हयात वापरलेली झायलो वाहन क्र . एम.एच. 48 – ए . – 4686 व टाटा एस वाहन क्र . एम . एच . 32- क्यु . 3684 असा जु.कि. 6,35,000 रू चा माल जप्त करण्यात आला आहे . सदरची कामगीरी प्रशांत होळकर , पोलीस अधीक्षक , यशवंत सोळंके , अपर पोलीस अधीक्षक , वर्धा , दिनेश कदम , उपविभागीय पोलीस अधिकारी , हिंगणघाट , पो.नि. संपत चव्हाण , स.पो. नि . पि.आर. पाटणकर , पोलीस स्टेशन , हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि . बी . पथकाचे पो.हवा . शेखर डोंगरे , नापोशि . निलेश तेलरांधे , सचिन घेवंदे , विशाल बंगाले , पोशि सचिन भारशंकर यांनी केली आहे …

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here