Home Breaking News अँड. वामनराव चटप भारत ज्योती पुरस्काराने सन्मानित* *राजुराच्या सुपुत्राचा दिल्लीत गौरव*

अँड. वामनराव चटप भारत ज्योती पुरस्काराने सन्मानित* *राजुराच्या सुपुत्राचा दिल्लीत गौरव*

355
0

राजुरा…

 

*अँड. वामनराव चटप भारत ज्योती पुरस्काराने सन्मानित*
*राजुराच्या सुपुत्राचा दिल्लीत गौरव*

राजुरा, दि. 09 – राजु-याचे माजी आमदार तथा शेतकरी नेते अँड. वामनराव चटप यांना आज (ता. 09) दिल्ली येथे भारत ज्योती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
विधानसभेतील त्यांचे प्रभावी कार्य, शेतक-यांच्या प्रश्नांवर सुरू असलेला सातत्यपुर्ण लढा, वेगळ्या विदर्भासाठी स्विकारलेली कणखर भूमिका व जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू असलेली धडपड व त्यांचा सेवाभाव या सर्व कार्यांची दखल घेत दिल्ली येथे त्यांना हा बहुमोल पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष उल्लेखनिय म्हणजे हा पुरस्कार मिळविणारे चटप हे महाराष्ट्रातील तिसरे व्यक्ती आहेत. यापुर्वी क्रिकेटर सुनिल गावस्कर व शिक्षण महर्षी तथा बिहारचे राज्यपाल डि. वाय. पाटील यांना हा बहुमान मिळालेला आहे.
इंडिया इंटरनँशनल फ्रेन्डशिप सोसायटीतर्फे दिल्ली येथे अँड. वामनराव चटप यांना हा पुरस्कार माजी स्थलसेना उपाध्यक्ष सरदार जगजीतसिंग, चेन्नईच्या राज्यसभा खासदार शशीकला पुष्पा रामास्वामी व राष्ट्रीय लोकदलाचे जनरल सेक्रेटरी श्रीयुत त्यागी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
अँड. चटप यांच्या विधानसभेतील कार्याची दखल घेऊन सांसदीय समितीतर्फे उत्क्रुष्ठ संसदपटू म्हणून गौरविण्यात आले आहे हे विशेष. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

 

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here