गढ़चांदुर…
*भाजपा वर्धापन दिनानिमित्त नोकारी खु. येथे*
*मोफत आरोग्य शिबीर व वयोवृध्दांना काठीचे वाटप*
वामन तुराणकर यांच्या संकल्पनेतून 45 वर्षावरील नागरिकांची लसीकरणासाठी मोफत नोंदणी*
राजुरा, दि. 8 एप्रिल : तालुक्यातील नोकारी (खु.) येथे भारतीय जनता पक्षाच्या 41 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वयोवृध्दांना काठीचे वाटप, गावकाऱ्यांना मास्क व सॉनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर घेवून गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नोकारीचे उपसरपंच वामण तुराणकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यालय परिसरात हा कार्यक्रम पार पडला.
यासाठी गडचांदूर येथील प्रतिष्ठित वैद्यकीय अधिकारी डॉ. देरकर यांनी विशेष योगदान देत गावकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली. उपसरपंच वामण तुराणकर यांच्याकडून आरोग्य जनजागृतीचे मौलाचे कार्य वारंवार घडून येत असून विशेष दिनांचे औचित्य साधून विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. आज भाजपा वर्धापन दिनानिमित्त गावातील 50 ज्येष्ठ नागरिकांना काठींचे वाटप करण्यात आले. कोविड – 19 प्रादुर्भाव काळात नागरिकांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टिने मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. गावातील उपस्थित नागरिकांना मास्क व सॉनिटायझर वाटप करून 45 वर्षावरील नागरिकांची कोविड लसीकरणासाठी मोफत नोंदणी करून देण्यात आली.
या आरोग्य कार्यक्रमाबद्दल नोकारी खु. येथील गावकऱ्यांनी आयोजकांचे आभार मानले असून पुढेही असेच आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजक वामण तुराणकर यांनी सांगितले. याप्रसंगी नोकारी च्या सरपंच श्रीमती. लता रामकिसन ऊईके, तंमुस अध्यक्ष राम पाटील कोरांगे, तंमुस माजी अध्यक्ष लिंगूजी येरमे, माजी पोलीस पोटील कर्णूजी आडे, प्रतिष्ठित नागरिक विशेषराव येरमे, डॉ. भोलेनाथ मेश्राम, जी. एन. पांडे, शंकर ननावरे, किशोर भोयर आदींची उपस्थिती होती. अंबुजा फाऊंडेशनच्या आरोग्य सेवीका गिरजाबाई मडावी व अंगणवाडी सेवीका साधना बतकी यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.
प्रतिकार न्यूज