Home आपला जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यात रेमीडिसविरचा काळा बाजार कराल तर कायदेशीर कारवाईला सामोरे जालं

चंद्रपूर जिल्ह्यात रेमीडिसविरचा काळा बाजार कराल तर कायदेशीर कारवाईला सामोरे जालं

39
0

Pratikar News

चंद्रपुर : जिल्ह्यामध्ये कोव्हिड -१९ या विषाणुवरील प्रतिबंधात्मक लस रेमीडिसविर औषध व ऑक्सीजन हे मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. तसेच सर्व केमीस्ट अॅन्ड ड्रगीस्ट यांना प्रशासनाकडून रेमिडिसविर या औषधाचा काळा बाजार करु नये अन्यथा या प्रशासनातर्फे औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा,१९४० व त्याखालील नियमांतर्गत कारवाई घेण्यात येईल अशी ताकीद देण्यात आली आहे.
रेमिडिसविर या औषधाचा काळा बाजार
करतांना कोणी आढळल्यास त्याबाबत
अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर या कार्यालयात तक्रार करावी व कोणताही अपप्रकारास बळी पडू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त नि.दि.मोहिते यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here