Home Breaking News लॉकडाउन हटविण्यासंदर्भात गुरुवारपर्यंत निर्णय न घेतल्यास शुक्रवारपासून (ता. नऊ) लॉकडाउन उधळत दुकाने...

लॉकडाउन हटविण्यासंदर्भात गुरुवारपर्यंत निर्णय न घेतल्यास शुक्रवारपासून (ता. नऊ) लॉकडाउन उधळत दुकाने सुरू केली जातील

69
0

Pratikar News

अमरावती : यापूर्वी लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करणारे व्यापारी तसेच नागरिकांवर पुन्हा एकदा निर्बंध लादण्यात आले असून या लॉकडउनला जनता कंटाळली आहे. लॉकडाउन हटविण्यासंदर्भात गुरुवारपर्यंत निर्णय न घेतल्यास शुक्रवारपासून (ता. नऊ) लॉकडाउन उधळत दुकाने सुरू केली जातील, असा इशारा भारतीय जनता पक्षांसह व्यापाऱ्यांनी दिला आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल करावे, अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली.

भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. सात) जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळालेले आहे. कोरोना नियंत्रणासाठी मध्यंतरी प्रशासनाकडून 15 दिवसांचे लॉकडाउन घोषित करण्यात आले होते. आता परिस्थिती नियंत्रणात असल्यानंतरही शासनाकडून पुन्हा लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने व्यापार, उद्योग, हॉटेल्स बंद असून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे किरण पातूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

रुग्णांची संख्या नियंत्रणात असताना आता लॉकडाउनची गरज नव्हती, असे मत माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केले. लॉकडाउन विरोधात असंतोष निर्माण झाला असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशारा माजीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी दिला. यासर्व बाबी लक्षात घेता कठोर लॉकडाउन न लावता उद्योगधंदे, व्यापार, स्वयंरोजगार, हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद होणार नाही, याची काळजी घेत किमान निर्बंध लावण्यात यावे, अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

व्यापाऱ्यांची शीर्षस्थ संघटना असलेल्या महानगर चेंबरच्या वतीने बुधवारी (ता. सात) जयस्तंभ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्च काढण्यात येणार असल्याचा मॅसेज समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आला होता. त्यानुसार सकाळी 11 च्या सुमारास काही व्यापारी जयस्तंभ चौकात जमले सुद्धा. मात्र पोलिसांनी जमावबंदीचे कारण देत त्यांना तेथून जाण्यास सांगितले. राज्यस्तरावर व्यापारी संघटनांशी मुख्यमंत्री चर्चा करणार असून त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी सांगितले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here