चिमूर…
प्रतिकार…प्रतिनिधी
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या वाड्या समोर
थाळी वाजवुन दिले निवेदन.
एसडीओ मार्फत सुध्दा शासनाला निवेदन.
चिमूर प्रतिनिधी जयंता कामडी
राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर च्या वतीने विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर दि ८ ऑक्टोबर ला थाळी वाजवा आंदोलन करीत
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रतिनिधी म्हणून भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले यांनी निवेदन स्वीकारले तसेच उपविभागीय अधिकारी मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले
ओबीसी समाजाची २०२१ मध्ये होऊ घातलेली जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर राज्य शासनाच्या माध्यमातून जातिनिहाय करण्यात यावी ,
मराठा समाजास आरक्षण देण्यास विरोध नसून ओबीसींच्या १९ टक्के आरक्षणातून देण्यात येऊ नये, ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह निर्माण करणे, महाज्योती संस्थेस एक हजार कोटीचे अनुदान देण्यात यावे ओबीसी समाजाचा रिक्त अनुशेष पूर्ण भरण्यात यावा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण लागू करण्यात यावे राज्यातील सर्व जिल्ह्यात ओबीसी कार्यालय सुरू करण्यात यावे एससी एसटी प्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शंभर टक्के सवलतीवर योजना लागू करण्यात याव्या आदी मागण्या निवेदनात नमूद होत्या
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली समनव्यक डॉ अशोक जीवतोडे व महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर च्या वतीने हुतात्मा स्मारक चिमूर येथून थाळी वाजवा आंदोलनास सुरवात होऊन मुख्य मार्गाने येत
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर थाळी वाजवून आंदोलन करण्यात आले तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रतिनिधी म्हणून भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले,अरुण लोहकरे यांनी निवेदन स्वीकारले
तसेच एसडीओ यांचे मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले
या थाळी वाजवा आंदोलनात गजाननजी अगडे, प्रकाश झाडे, राजू लोणारे ,ईश्वर डुकरे, अरुण लोहकरे, पस सभापती लता पिसे पस सदस्य भावना बावनकार नगरसेविका उषा हिवरकर नरेंद्र राजूरकर कीर्ती रोकडे, किशोर मुंगले कवडू लोहकरे हरीश पिसे आदी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .