Home आपला जिल्हा अखेर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना योद्ध्यांची माफी मागितली… ३ दिवसात थकीत...

अखेर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना योद्ध्यांची माफी मागितली… ३ दिवसात थकीत पगार जमा करण्याचे आश्वासन सुध्दा दिले…

238
0

चन्द्रपुर…

अखेर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना योद्ध्यांची माफी मागितली…
३ दिवसात थकीत पगार जमा करण्याचे आश्वासन सुध्दा दिले…

तुर्तास या वादावर पडदा टाकून कामगारांच्या हक्काची लढाई सुरू ठेवणार…. पप्पू देशमुख

डेरा आंदोलनातील कोरोना योध्द्या कामगारांच्या बाबत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केले होते.या वक्तव्यामुळे संतापलेल्या डेरा आंदोलनातील कामगारांनी काल पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जीवावर उदार होऊन कोरोना आपत्तीमध्ये विनावेतन ७ महिने
रुग्णसेवा करणाऱ्या शेकडो महिला- पुरुष कोविड योद्ध्यांचा अपमान केलेला आहे.पालकमंत्र्यांनी सर्व आंदोलनकर्त्या कोरोना योध्द्यांची माफी मागावी.अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा डेरा आंदोलनातील मंडपामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काल जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख व आंदोलनकर्त्या कामगारांनी दिला होता. यानंतर समाज माध्यमातून सुद्धा पालकमंत्र्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आपली चूक लक्षात आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी रात्री उशिरा जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला तसेच करोना योद्ध्यांनी आपत्तीमध्ये केलेल्या रुग्णसेवेबद्दल आपल्याला पूर्ण आदर आहे. कोरोना योध्द्यांचा अपमान करण्याचा आपला उद्देश नव्हता. मात्र वादग्रस्त वक्तव्य केल्याची चूक आपल्या हातून झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त करून चुकीच्या वक्तव्याबद्दल सर्व करोना योद्धांची माफी सुद्धा मागितली. जे कामगार कामावर येण्यासाठी तयार आहेत त्यांना कोणी अडविण्याचा प्रयत्न करू नये, त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास प्रशासन कठोर कारवाई करेल असे सांगण्याच्या ओघात चुकीचे वक्तव्य झाल्याची सबब पालकमंत्र्यांनी दिली.
यानंतर दोन ते तीन दिवसात सर्व कामगारांच्या खात्यांमध्ये पगार जमा करण्याचे आश्वासन त्यांनी जनविकास चे अध्यक्ष देशमुख यांना दिले.मागील २ महिन्यांपासून डेरा आंदोलन करणाऱ्या ५०० च्या जवळपास कामगारांचा अपमान झाल्यामुळे पालक मंत्री यांनी माफी मागावी अशी मागणी जनविकास सेने कडून करण्यात आली होती. पालकमंत्र्यांनी आपल्या चुकीची कबुली देऊन दिलगिरी व्यक्त केली व माफी सुध्दा मागितली.
यापूर्वी पालकमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांचा थकीत पगार खनिज विकास निधीतून देण्याचे सहकार्य केले होते. डेरा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सुद्धा त्यांनी मंत्रालय स्तरावर अनेक बैठकींचे आयोजन करून आंदोलनाला सहकार्य केलेले आहे.त्यामुळे आंदोलनकर्त्या कामगारांनी तूर्तास या वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कामगारांच्या हक्काची लढाई पूर्ण ताकतीने पुढे सुरू ठेवण्यात येईल अशी भूमिका जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली.जोपर्यंत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून कामगारांच्या खात्यामध्ये पगार जमा करण्यात येत नाही तोपर्यंत डेरा आंदोलन सुरू राहील असे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

धन्यवाद !
आपला
(पप्पू देशमुख)

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here