Home Breaking News केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचे ,विरोधात कोळसा खाण कामगाराचे धरणे आंदोलन…

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचे ,विरोधात कोळसा खाण कामगाराचे धरणे आंदोलन…

5
0

राजुरा..

प्रतिकार..

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचे विरोधात कोळसा खाण कामगारांचे धरणे आंदोलन
राजुरा.
केंद्र शासनाने कोळसा क्षेत्रात कमर्शियल मायनिंग ला परवानगी दिल्याच्या विरोधात आणि कामगार कायद्यात उद्योगपती धार्जिणे संशोधन केल्याच्या निषेधार्थ कोळसा क्षेत्रातील पाच कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व कामगारांनी बल्लारपूर मुख्य महाप्रबंधक कार्यालयापुढे काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले. सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास पुन्हा संपाचे हत्यार उपसणार असल्याचा इशारा संयुक्त मोर्चाचे आर. शंकरदास यांनी यावेळी बोलताना दिला.
सरकार कोळसा खाणी चे खाजगिकरणासाठी करण्यासाठी वेगात पाऊले उचलीत असल्याने कोळसा खाण क्षेत्रात कामगार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आता पुन्हा या क्षेत्रात संघर्ष अटळ असल्याचे दिसत आहे.
या धरणे आंदोलनात कोळसा क्षेत्रात कार्यरत इंटक,बीएमएस,आयटक, एचएमएस,सिटू या पाच मान्यताप्राप्त संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त मोर्चा बनविला आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात आता संपाची सूचनाही देण्यात आली आहे. केंद्र सरकारने कामगार कायदे संकुचित करून आणि कर्मशियल मायनिंग ची परवानगी देऊन कोल इंडिया हे सार्वजनिक क्षेत्र संपवून ते खाजगी उद्योगपतीकडे देण्याचा प्रयत्न चालविला आहे. या धोरणांचा जोरदार घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व आर. शंकरदास,मधुकर ठाकरे,अनिल निब्रड, जोगेंद्र यादव,अशोक चिवंडे,गणपत कुडे,रायलिंगु झुपाका,दिलीप कनकुलवार, आर.आर.यादव,ईश्वर गिरी,रवी डाहुले,गणेश नाथे,दिनेश जावरे, रंगराव कुलसंगे,विवेक अल्लेवार, मारोती नन्नावरे,बादल गर्गेलवार, पांडुरंग नांदूरकर,विश्वास साळवे यांचेसह अनेक कामगार नेते यांनी केले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here