Home Breaking News वेकोलीच्या खाजगी कंपनीत मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू कंपनीत मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर;...

वेकोलीच्या खाजगी कंपनीत मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू कंपनीत मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर; मृताच्या नातेवाईकांकडून मदतीची मागणी

114
0

राजुरा…

वेकोलीच्या खाजगी कंपनीत मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू

कंपनीत मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर; मृताच्या नातेवाईकांकडून मदतीची मागणी

राजुरा : पोवनी-३ कोळसा खाणीत कार्यरत असलेल्या खाजगी कंपनीत मुन्ना कंत्राटदाराकडे कामावर असलेल्या विशाल गणपत हंसकर (वय १९) राहणार वरोडा यांचा आज कामावर असतांना सायंकाळी ४ वाजता पंप सुरु करण्यासाठी पाण्यात उतरला असता बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे.

बल्लारपूर वेकोली क्षेत्रांतर्गत येत असलेल्या पोवनी-३ या कोळसा खाणीत खाजगी कंपन्यांचा भरणा असून या ठिकाणी खाजगी कंपनीचे कोळसा काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे, मुन्ना कंत्राटदाराकडे वरोडा येथील विशाल हंसकर आज दिवस पाळीत काम करीत असताना पाण्यातील मोटार पंपचा पाईप जोडण्यासाठी गेला असता खोल पाण्यात बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
खाजगी कंपनीत मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत असल्याने नेहमी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर येत असतो, आज झालेल्या घटनेत सुद्धा सुरक्षा नसल्याने मजुरांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जात आहे.

पोवनी-३ या कोळसा खाणीकरीता अधिग्रहीत केलेल्या साखरी, पोवनी, वरोडा, चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या परंतु अजूनपर्यंत नोकऱ्या मिळाल्या नाही मात्र कोळसा उत्पादन सुरू आहे . वेकोलीच्या मनमानी कारभाराला अनेक प्रकल्पग्रस्त बळी पडत असून चार दिवसांपूर्वी वेकोलीच्या नियोजन अधिकारी यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे वीस वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली आहे. स्थानिक बेरोजागांना रोजगार देण्यासाठी टाळाटाळ करीत असून त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने विशाल हंसकर यांच्या मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मदतीची मागणी केली आहे.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here