Home क्राइम भद्रावतीच्या मंडळ अधिकार्‍यास लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या ताब्यात.

भद्रावतीच्या मंडळ अधिकार्‍यास लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या ताब्यात.

43
0

Pratikar News

(प्रतिकार   न्यूज नेटवर्क ) 
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील मौजा चरुर (धारापुरे) येथील जमिनीचे फेरफार करुन देण्याकरीता जमिन मालकाला २ हजार रुपये लाचेची मागणी करणा-या मंडळ अधिका-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दि.१ एप्रिल रोजी रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले आहे. 
            प्राप्त माहितीनुसार,चंद्रपूर येथील एका इसमाची भद्रावती तालुक्यातील मौजा चरुर(धारापुरे) येथे भूमापन क्र.१२९/२ मधील १ हेक्टर ६२ आर जमिनीचे फेरफार करुन देण्याकरीता येथील तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रशांत नरेंद्रप्रतापसिंह बैस (५१) यांनी जमिनमालकाला २ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्या व्यक्तीची बैस यांना पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि.१ एप्रिल रोजी येथील तहसील कार्यालयात सापळा रचला. दरम्यान, बैस यांनी तडजोड करुन १५०० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे तक्रारदाराने पंचासमक्ष बैस यांच्याकडे १५०० रुपयाची रक्कम देताच सापळा लावून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बैस यांना अटक केली.
               
        ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपायुक्त रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद तोतरे, चंद्रपूर उपअधीक्षक अविनाश भामरे, पो.ह. मनोहर एकोणकर, ना.पो.काॅ. संतोष येलपुलवार, अजय बागेसर, पो.काॅ. रोशन चांदेकर, 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here