Home आपला जिल्हा गडचांदूर येथील बुध्द भूमीत पक्षान करीता चारा पाणीची व्यवस्था सभापती राहुल...

गडचांदूर येथील बुध्द भूमीत पक्षान करीता चारा पाणीची व्यवस्था सभापती राहुल उमरे यांचा स्तुत्य उपक्रम

69
0

गड़चांदुर …सिद्धार्थ द्वारा

गडचांदूर येथील बुध्द भूमीत पक्षान करीता चारा पाणीची व्यवस्था
सभापती राहुल उमरे यांचा स्तुत्य उपक्रम

 

कोरपना :-
दिवसेंदिवस उन्हाळा तापत आहे. या उन्हाची झळ पक्षांना पोहचू नये या करीता नगर परिषद गडचांदूर चे सभापती व सामाजिक कार्यकर्ते राहुल उमरे व मित्र परिवार यांनी गडचांदूर येथील बुध्द भुमी च्या झाडांवर पक्षान करीता चारा व पाण्याची व्यवस्था करुन पक्षान विषयी मानवतेच्या जागृती दाखवली आहे.
यंदा एप्रिल व मे महिन्यात उन्हाळ्यात सुर्य आग ओकणार आहे. याची झळ मानवासोबतच जनावरे पक्षाना पोहचणार आहे. ही झळ पोहचू नये या करीता विविध संघटना एकवटल्या आहे. जनजागृती म्हणुन जनतेला आव्हान करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून गडचांदूर येथील बुध्द भुमी ही अमलनाला धरणाजवळ व माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी आहे. हा परिसर जंगलानी व्यापला आहे. त्यामुळे या परिसरात जनावरे व पक्षांचा मोठा किलबिलाट असतो. ऊन्हाळयात पक्षांची चारा पाणी ची सोय व्हावी या करीता सभापती राहुल उमरे व त्यांचा मित्र परिवार एकत्र येऊन स्व खर्चाने तेलाचे पिपे विकत घेवुन पक्षांना एकाच ठिकाणी चारा व पाणी उपलब्ध व्हावे अशा पध्दतीने पिप्याना कापुन झाडाला लटकविण्यात आले. त्या मुळे बुध्द भूमी परिसरातील पक्षांना या मुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमाबाबत राहुल उमरे व मित्र परिवारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या स्तुत्य उपक्रमात नगरसेवक तथा सभापती राहुल उमरे, विक्की मुन, देवानंद मुन संघर्ष रामटेके, प्रणव धवळे इत्यादी ने सहकार्य केले.

स्वताला संपादक म्हणून मिरवनारे बातम्याची कॉपी करतात अशा भामट्यापासून.सावध राहा .

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here