Home Breaking News केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्याची. महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करावी…

केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्याची. महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करावी…

40
0

गोंडपिपरी ….

*केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करावी*

*माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा गोंडपीपरी तालुक्याच्या वतीने निषेध आंदोलन*

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राष्टाहित व जनहिताचे केवळ अनेक ऐतिहासिक निर्णयच घेतले नाही तर यशस्वी अंमलबजावणी करण्याचे कामही केले,आता मोदी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडविणारे पाऊल उचलले आहे.मात्र शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम असणारी कॉग्रेस आणि महाविकास आघाडी सरकार अकारण कांगावा व अपप्रचार करून राजकारण करीत आहे.या मागणी घेऊन भारतीय जनता पार्टी गोंडपीपरीच्या वतीने तहसील कार्यालय समोर निषेध आंदोलन करण्यात आले,हे आंदोलन माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखंडातून मुक्त होऊन आपल्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालाच्या विक्री व बाजारपेठेत स्वातंत्र्य मिळणार आहे.शेतकऱ्यांसाठी एक देश,एक बाजार पेठ असणार आहे.आपल्या शेतीमाल कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदीजींनी एसएमपी कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे. नेहमीच शेतकऱ्यांबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवून शेतकऱ्यांना दिलेल्या मतांचा अधिकार काढून घेणाऱ्या महाराष्टातील बेगडी नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारने दिलेले शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरवणारा स्थगिती आदेश काढला आहे.हा स्थगिती आदेश तातडीने रद्द करून केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे.केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने संबंधित स्थगिती आदेश त्वरित रद्द करावा अशीही मागणी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली मा.तहसीलदार गोंडपीपरी यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या सह भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे,पंचायत समिती सभापती सौ सुनीता येग्गेवार,उपसभापती अरुण कोडापे, जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती वडपलिवार,जिल्हा परिषद सदस्य सौ कल्पना अवथरे,भाजपा नेते अमर बोडलावार,भाजपा नेते गणपती चौधरी,भाजपा नेते निलेश संगमवार,माजी सभापती दिपक सातपुते,माजी उपसभापती मनिष वासमवार,नगरपंचायत सभापती चेतनसिंग गौर,नगरपंचायत सभापती राकेश पुन,माजी नगराध्यक्ष संजय झाडे,भाजपा नेते किशोर चिंतावार,ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष निलेश पुलगमकर,साईनाथ मास्टे,ओबीसी आघाडी तालुका महामंत्री प्रशांत येल्लेवार, गणेश डहाळे,स्वप्नील अनमूलवार भानेश येग्गेवार,बाळू फुकट,सुहास माहुरकर,प्रकाश रापरवार,रमेश दिनगलवार,गणेश मेरगुरवार, दिपक झाडे,मारोतराव झाडे,मारोती ठाकूर,लक्ष्मण येलमूले आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here