बल्लारपूर….
. आंदोलन ..शेतकरी ,शेतमजुर,जगला पाहिजे…
केंद्र सरकारचे शेतकरी ,शेतमजुर विरोधी विध्येकाच्या विरोधात बल्लारपूर कांग्रेस कमिटीच्या वतीने,आंदोलन करण्यात आले,कांग्रेस च्या वतीने देशभर आंदोलनाची हाक दिली .त्यानुसार जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात आंदोलन करण्यात आले आहे.केंद्र सरकारच्या काळात शेतकरी ,शेतमजुर आर्थिक संकटात सापडला असून ,त्या गंभीर प्रश्नाकडे केंद्र सरकार जाणून ,बुजून दुर्लक्ष करीत असल्याने,शेतकरी,शेमजुराचे जगणे मुश्किल झाले आहे.सरकारला जागे करण्यासाठी संपूर्ण भारतभर आंदोलन कांग्रेस पक्षाचे वतीने ,करण्यात येत आहे,
त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या ठिकाणी होत आहे.
या आंदोलनात शहरातील गणमान्य काँग्रेसचे पदाधिकारी ,
यांनी केंद्र सरकार शेतकरी विरोधी विधेयकाच्या विरोधात शहर काँग्रेस कमेटी बल्लारपुर तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले या कार्यक्रमाला अब्दुल करीम शेख अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी बल्लारपुर घनश्याम भाऊ मुलचंदानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी आणि समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते ऊपथित होते.