Home आपला जिल्हा राजुरा शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. — आमदार सुभाष धोटे....

राजुरा शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. — आमदार सुभाष धोटे. ५ कोटी ११ लाखाच्या विकास कामांचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उद्घाटन.

148
0

 

राजुरा…

 

राजुरा शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.
— आमदार सुभाष धोटे.

५ कोटी ११ लाखाच्या विकास कामांचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उद्घाटन.

राजुरा (ता.प्र) :– राजुरा शहर नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात विकासाचे नवे क्षितिज गाठित असून या आधी आपण मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, या वर्षी ५ कोटी ११ लाखाच्या निधीतून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. राजुरा शहर विकासासाठी आपले पुर्ण सहकार्य असून निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
यात नागरी दलीत वस्ती सुधारणा योजना अंतर्गत अं.क्र.१ ते ६ कामे अंदाजित खर्च ८५ लाख ८ हजार रुपये निधी, १४ वा वित्त आयोग अंतर्गत माजी मालगुजारी तलाव विकास व इतर कामे करणे १ कोटी १७ लाख ७३ हजार रुपये निधी, विशेष वैशिष्ट्यपुर्ण योजना अंतर्गत न.प. हद्दीत अ.क्र. १ ते १८ कामे करणे ३ कोटी २७ लाख ६६ हजार रुपये निधी, चुनाळा टि पाईट जवळ सौंदर्यींकरण करणे १८ लाख ७१ हजार रुपये निधी अशी एकूण ५ कोटी ११ लाखाची विकास कामे शहरात होणार आहेत.

भाऊ आपनाला बुद्ध भूमि वर सौदर्यकरन आणि सरंक्षण भींत साठी मागील वर्षी ,आणि या वर्षी दोन पत्र दिले,नगर परिषदेला 2018 पासून पत्र
देत आहो पण पाणी कुठे मुरते पत्ता नाही, गावाचा विकास जरूर झाला पाहिजे तर दुसरीकडे एका बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्धभूमिवर लक्ष दिले तर बरे होइल भाऊ!!!

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष अरुण धोटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू, आरोग्य सभापती आनंद दासरी, सभापती राधेश्याम अडानिया, विरोधी पक्षनेते रमेश नळे, नगरसेवक गजानन भटारकर, नगरसेविका गीता रोहने, संध्या चांदेकर, साधना भाके, अभियंता रवी जामुनकर , कंत्राटदार उपेंद्र गुप्ता यासह सर्व नगरसेवक, न प कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले , संचालन विजय जांभुळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी आर्शीया जुही यांनी केले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here