Home आपला जिल्हा षडयंत्रकारी केंद्र सरकार आणि भाजपामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक. ...

षडयंत्रकारी केंद्र सरकार आणि भाजपामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक. — आमदार सुभाष धोटे. केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात राजुरा काँग्रेसचे उपोषण.

123
0

षडयंत्रकारी केंद्र सरकार आणि भाजपामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक.
— आमदार सुभाष धोटे.

केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात राजुरा काँग्रेसचे उपोषण.

राजुरा (ता.प्र) :–
केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांमुळे देशभरातील शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होणार आहे. आपल्या निवडक व्यापारी मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी हे सरकार शेतकर्‍यांच्या जीवाशी खेळत आहे. या तिन्ही काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमेवर मागील १०० दिवसांपेक्षा जास्त काळ ठान मांडून बसले आहेत. यात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. केंद्र सरकारने एका मागून एक सरकारी संस्थांचे खासगीकरण करीत असून कामगार कायद्यांतील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत, या सरकारला सर्व सामान्य माणसाच्या जीवनमरणाचे काहीही देणेघेणे नाही म्हणूनच कोरोना सारख्या महामारी च्या तडाख्यात आर्थिक खाईत सापडलेल्या नागरिकांना इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रचंड वाढ करून त्यांचे कंबरडे मोडले जात आहे. या षडयंत्रकारी केंद्र सरकार आणि भाजपामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या या सर्व अन्यायकारक कायदे आणि धोरणांविरोधात हे उपोषण आंदोलन आहे. आता तरी सरकारने जागे व्हावे अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष धोटे यांनी मार्गदर्शन करताना दिली. या प्रसंगी अनेकांनी आपल्या मार्गदर्शनातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.
आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय राजुरा येथे सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत उपोषण व धरणे आंदोलण करण्यात आले. यानिमित्ताने महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोवीद यांना तहसीलदार यांच्या मार्फत तीन काळे कृषी कायदे मागे घ्यावे अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, अशोकराव देशपांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, राजुरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रंजन लांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर, उपसभापती मंगेश गुरुनुले, प.स. सदस्य तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, कुंदाताई जेणेकर, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, न प सभापती हरजीत सिंग संधू, नगरसेवक गजानन भटारकर, दिपा करमनकर, संध्या चांदेकर, गीता रोहने, साधना भाके, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कार्या अध्यक्ष नंदकिशोर वाढई, मोहसीन अली बंदाली, जश्विंदरसिंग धोत्रा, युवक शहर अध्यक्ष अशोक राव, सर्वानंद वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, युवक तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, शहराध्यक्ष रफिक शेख, रामभाऊ ढुमने, अॅड. रामभाऊ देवईकर, उमेश मिलमिले, कवडू सातपुते, शिवराम लांडे, लहू चहारे, पंढरी चंन्ने, विनोद दरेकार, वसंता ताजने, विकास देवाडकर, इर्शाद शेख, साबीर सय्यद, संतोष इंदुरवार, सुमित्रा कुचनकर, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर. नंदाताई गेडाम पुष्पवर्षा जुलमे, शारदा मोहितकर, आरपीआयचे पुष्पा मोरे, कविता मोरे, लता डकरे, सुप्रिया गेडाम, सुजित कावळे, संदीप पोगला, एकनाथ कौरासे, राहुल वनकर, सचिन मोरे यासह राजुरा तालुका काँग्रेस कमेटी, सेवादल काँग्रेस, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनु.जाती जमाती विभाग, किसान काँग्रेस, तालुका युवक कॉंग्रेस, शहर काँग्रेस , शहर युवक कॉंग्रेस, एन.एस.यु.आय, राष्ट्रवादी काँग्रेस, इत्यादी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

प्रतिकार न्यूज़

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here