Home क्राइम दुकान पंक्चरचे आणि काम अवैध डीझल व दारूविक्री

दुकान पंक्चरचे आणि काम अवैध डीझल व दारूविक्री

69
0

प्रतिकार न्युज

गडचांदूर/विशेष प्रतिनिधी :-
डिझेल,पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे. यात दिवसेंदिवस होत असलेली दरवाढ लक्षात घेता डिझेल चोरी व काळाबाजारीचे प्रकरणात सुद्धा वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर गडचांदूर भोयगाव मार्गावरील नारंडा फाटा येथील “सॅम्युअल होमियोपैथी” या दवाखान्या समोर एका टायर पंक्चरच्या दुकानात अवैध रित्या डिझेल साठवणूक करून विक्री केली जात आहे.

तसेच दूकानात व मागे पडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या पाहून याठिकाणी डिझेल सोबतच अवैध दारूविक्री सुद्धा जोरात सुरू असल्याची शंका निर्माण होत आहे.सदर मार्गावरील सिमेंट,कोळसा वाहतूक करणाऱ्या मोठमोठ्या वाहनांचे चालक स्वत: डिझेल काढून देताना निदर्शनास येत आहे.

अशाप्रकारे अवैधरीत्या साठवणूक केलेल्या डिझेल बाबत सदर प्रतिनिधींनी त्याठिकाणी उपस्थित एका व्यक्तीला विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तर दुसऱ्याने चक्क डिझेल आणून देणाऱ्या वाहन चालकाला अश्लील हातवारे करत सांगितले की “भीतीचे काहिच कारण नाही,कुणीच काही उप…! नाही” हा व्यक्ती दारूचे सेवन करून होता.सदर ठिकाणी टायर पंक्चरच्या नावाखाली इंधन विक्रीचे सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून अवैधरीत्या सर्रासपणे डिझेलची साठवणूक व विक्री तसेच जिल्हा दारूबंदी असताना बिनधास्तपणे अवैध दारूविक्री होत असून संबंधितांनी याकडे लक्ष देऊन सदर दुकानदारावर कायदेशीर कारवाई करून याठिकाणी सुरू असलेला प्रकार बंद करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here