Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात पोम्भूर्णा वनपरिक्षेत्रात जंगल सफारी सुरू

चंद्रपूर जिल्ह्यात पोम्भूर्णा वनपरिक्षेत्रात जंगल सफारी सुरू

47
0

Pratikar News

पोम्भूर्णा – जंगल सफारी पर्यटनाला चंद्रपूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतांना मध्य चांदा वनविभागातील वनपरिक्षेत्र पोम्भूर्णा येथे वनपर्यटनाची सुरुवात 26 मार्चपासून करण्यात येत आहे.

लोकसहभागातून वन्यजीव व्यवस्थापन करणे, मानव व वन्यजीव यांच्यात सहजीवन प्रस्थापित होणे व ग्रामीण भागातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून या सफारीला सुरुवात होणार आहे.
पोम्भूर्णा वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण, चितळ, सांभार, नीलगाय असे विविध प्रकारचे वन्यजीव या क्षेत्रात आहे.
26 मार्चला प्रायोगिक तत्वावर खाजगी वाहन यांना प्रवेश देण्यात येणार असून त्यासाठी प्रवेश शुल्क 500 रुपये व गाईड शुल्क 350 रुपये असणार आहे, प्रति दिन सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत 6 वाहन व 2 ते 4 वाजेपर्यंत 6 वाहनांना प्रवेश असणार आहे.
सफारीचे विशेष आकर्षण म्हणजे पोम्भूर्णा वनपरिक्षेत्रात असणारे अतिविशिष्ट अतिथीगृहात थांबणाऱ्या पर्यटकांना प्रायोगिक तत्वावर सफारी विनाशुल्क असणार आहे. फक्त पर्यटकांना गाईडने शुल्क द्यावे लागणार आहे.
भविष्यात सदर पर्यटन ऑनलाईन बुकिंगसाठी www.mytadoba.org या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे.
सदरचा मार्ग पोंभुर्णा वनक्षेत्रातील कक्ष क्र. 95,93,100,92,91,88,87 मार्गी परत पोभुर्णा पर्यंत पसरलेला आहे. सदरच्या परिसरात वनविभागाच्या कर्मचा-याकडुन पर्यटन देखरेख व नियंत्रन करण्यात येणार आहे. भविष्यात स्थानिक लोकांना रोजगार देण्याचे उदेशाने पर्यटन आणि वन व वन्यजीव व्यवस्थापन याबाबत संयुक्त वनव्यवस्थापन समिती केमारा यांचा निर्णय व्यवस्थापनाचे दृष्टीने घेण्यात येईल. पर्यटनासंबधी अधिक माहीतीसाठी कु.ए.डी.खोब्रागडे 9272423143 वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा व श्री.डी.एम.रामटेके 9604852646 वनरक्षक पोंभुर्णा यांचेशी संपर्क साधावा.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here