Pratikar News


भद्रावती (तालुका प्रतिनिधी)
येथून जवळच असलेल्या चालबर्डी(रै.) येथील जि.प.प्राथमिक शाळेतील सामान अज्ञात इसमाने अस्ताव्यस्त फेकून दिल्याची घटना दि.२३ मार्चच्या रात्री घडली.
प्राप्त माहितीनुसार,भद्रावती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चालबर्डी (रै.) येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या खोल्यांमध्ये शालेय वस्तू ठेवून होत्या.दरम्यान,दि.२३ मार्चच्या रात्री अज्ञात इसमाने खोलीच्या दरवाजाचा टिनाचा पत्रा वर करुन आत प्रवेश केला. त्यानंतर तेथील सामान खाली अस्ताव्यस्त फेकून दिले. दि.२४ मार्च रोजी सकाळी शाळेत गेल्यावर सदर प्रकार शिक्षकांच्या लक्षात आला.त्यांनी लगेच भद्रावती पोलिसांना माहिती दिली.पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा करुन चौकशी सुरु केली.विशेष म्हणजे अज्ञात आरोपीने कोणतीही वस्तू चोरुन नेली नाही.त्यामुळे त्याचा चोरीचा प्रयत्न फसला की त्याने सामानांची फेकाफेक करुन आपला राग व्यक्त केला हे प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत.