Home Breaking News चिमूर नगर पंचायतीचा ,चार आण्याची कोंबडी. बारा आण्याचा मसाला.असाही भोंगळ कारभार

चिमूर नगर पंचायतीचा ,चार आण्याची कोंबडी. बारा आण्याचा मसाला.असाही भोंगळ कारभार

184
0

चिमूर…
प्रतिनिधी ….
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोणा आणि मिळालेले अधिकार याचा पुरेपूर उपयोग चिमूर नगर पंचायतीने उचलला असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या महिन नुसार,कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता नगर परिषद क्षेत्रात निर्जुतुकिकरन करण्यासाठीच स्प्रे पंप खरेदी करण्यात आले.खरेदी केलेल्या पंप खर्च मंजुरी करिता 6 आक्तोंबर ला सर्वसाधारण सभेत,मांडण्यात आले,तेव्हा. 3000 हजार रुपये पर्यंतचा स्प्रे पंप तब्बल19हजार948 रुपयाला तत्कालीन मुख्यधिकारी मंगेश खवले यांनी खरेदी केल्याचे नगर सेवकांच्या लक्षात आले.हा केलेला खर्च सर्वसाधारण सभेने नामंजूर केला.
चिमूर मधील हा दुकानदार कोण आता प्रश्न समोर आला.

आता नगर पंचायतीने ठरवायचं आहे,अशा दुकांदरविरोधात कोणती कारवाई करायची,हे ठरवावे लागेल तेव्हाच पुढे असे बिल वाढवून देणार नाही.

तसेच खवले यांचे कार्यकाळात केलेल्या खर्च याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
नगर पंचायत कार्यालयांनी नगर परिषद कर्मचारी याना पगार देताना,शासनाच्या नियमनुसार ठरवून दिलेल्या प्रमाणे पगार देन्यात यावा. 300रुपये पगार स्वामर्जीने ठराव बदल केल्याचा आरोप नगर सेवक संजय खाटीक यांनी केला आहे.

अशा अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा सभागृहात ठरविण्यात आले.सर्वसाधारण सभेला नगराध्यक्ष गोपाल झाडे,उपाध्यक्ष तुषार शिंदे,बांधकाम सभापती .अ.कदीर शेख.,भारती गोडे, उषाताई हीवरकर, जयश्री निवटे,छाया कंचार्लावर,अड अरुण दुधकार,उमेश हिंगे,नितीन कटारे,व संजय खाटीक इत्यादी,नगर सेवक उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here