Home शैक्षणिक शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथील विविध योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा …...

शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथील विविध योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा … मुख्यमंत्री ना निवेदन प्रा. अशोक लांजेवार सुराज्य सेना जिल्हाध्यक्ष

102
0

Pratikar News

 (गडचिरोली प्रतिनिधी)

गडचिरोली : – शासकिय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथील अनेक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी गडचिरोली येथील शासकिय विज्ञान महाविद्यालय यांना निधी दिलेला आहे मात्र नियोजन शुन्य कारभारामुळे आर्थिक गैरव्यवहार तथा भ्रष्टाचार करुन निधी हडप केल्याचा प्रकार माहिती अधिकाराच्या प्राप्त माहितीनुसार दिसुन येत आहे.राष्टीय उच्चतर शिक्षण अंतर्गत निधी, संगणक खरेदी न करता बोगस बिले दाखवलेली आहेत.अशा अनेक प्रकारच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचे माहिती अधिकारातुन दिसुन येत आहे.सर्व कामची निविदा, अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका याची सखोल पणे चौकशी करावी अशी मागणी प्रा. अशोक लांजेवार सुराज्य सेना जिल्हाध्यक्ष यांनी मुखयमंत्र्यांकडे केली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here