Home आपला जिल्हा चन्द्रपुर जिल्ह्यात उद्योग कोमात! ..मात्र प्रदूषण जोरात ..जनतेच्या आरोग्यवर विपरीत परिणाम…

चन्द्रपुर जिल्ह्यात उद्योग कोमात! ..मात्र प्रदूषण जोरात ..जनतेच्या आरोग्यवर विपरीत परिणाम…

103
0

गड़चांदुर …

प्रदूषण❗दुषण कोणाला
महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक प्रदुषित जिल्हा असल्याची नोंद आहे.

. तर या जिल्ह्यातील संवेदनशील शहर देखील असावच!
जिल्ह्यात अनेक उद्योग, सिमेंट, कोलमाईन्स कार्यरत आहेत. या सर्व कारखान्यामधून रात्रंदिवस विषारी धूर वातावरणात निर्गमित केला जातो! रात्रीच्या अंधारात तर धूर ओकण्याचं प्रमाण लक्षणिय असतं! *यावर अंकुश म्हणावा तसा दिसत नाही ही खरी शोकांतिका आहे **
हायवेने लोडेड तर कधी अती लोडेड ट्रकांचं रात्रंदिवस आवागमन सुरु असतं! साहजिहकच प्रदुषण व तापमान वाढीस हाही घटक तेव्हढाच जबाबदार आहे. नागरिक प्रदुषणास जबाबदार नाही असे म्हणणे धाडसाचेच होईल: असे म्हणे धाडसाचेच होईल!
#नागरिक धुराच्या प्रदुषणाने व तापमान वाढीने त्रस्त असणे स्वाभाविक आहे. यात सूर्यही आग ओकत असल्याने सा-यांचा जीव मेटाकुटीस येतो! पण दुषण द्यावे कोणाला?
#नगरवासीयांचे भविष्य असुरक्षित आहे,पण अंधकारमय न होओ एवढेच! मात्र भिती मानगुटीवर बसलेली आहे. फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी तर होणार नाही ना? ही भिती घर करुन आहे.
#असं वाचण्यात आलय की, अमेरिकेतील पिट्सबर्ग हे जगातील सर्वात प्रदुषित शहर! जगात प्रदुषणासाठी नावाजलेले पिट्सबर्ग शहर!!!
पण——तेंव्हाचे अमेरिका राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रयत्नांना यश आले!!
वामनराव मत्ते: बराक ओबामा यांच्या प्रयत्नांना यश आले व अमेरिकेतील हे शहर पर्यावरण शुध्द बनले!! पर्यावरण शुध्द पिट्सबर्ग!!!
#अशी किमया करणारा आत्मनिर्भर किमयागार भारतातही होणार नाही असे कसे म्हणता येईल?
#व असा किमयागार भारतात तयार झाल्यास डेनमार्क, फिनलैंड, नार्वे व जपान या देशांच्या पंगतीला आपणही बसू की!!! सर्वात प्रदुषित असणारं शहरही पर्यावरण शुध्द देशांच्या पंगतीला बसू शकतं किमयागारांच्या किमयाने!!!
#होय, पण गरज आहे भारतीय बराक ओबामाची!!
प्रतिक्षा करु या भारतीय किमयागारांची!! पर्यावरण शुध्द वातावरणाची!!!

संकलन
वामनराव मत्ते!
सेवानिवृत प्राचार्य

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here