Home आपला जिल्हा कुस्तिगारांनी जिल्हा क्रिडा कार्यालयातून मानधन उचल करण्याचे आवाहन

कुस्तिगारांनी जिल्हा क्रिडा कार्यालयातून मानधन उचल करण्याचे आवाहन

57
0

Pratikar News

चंद्रपूर, दि:15, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदमार्फत आयोजित अधिवेशनात गादी व माती विभाग प्राविण्य प्राप्त व सहभागी कुस्तीगीरांना क्रिडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत सन 2019 -20 या वर्षात कुस्ती कलेचा विकास मानधन योजने अंतर्गतचे मानधन जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे प्राप्त झाले आहे.
मानधनासाठी पात्र ठरलेल्या कुस्तीगारांत उमेश यादव, विजय कुहाटीवाले, सागर भेदोडकर, शुभम मोगरे, मयुर चोले, सुबेर मंडल ,विजय रेंदले, इमरान तिहाले, हिमायु अली, राजु कल्ला, अंकुश राखडे, अतुल सज्जनवार, अमोल राऊत ,चेतन वाणी, अश्विन खणके, अमोल डेंगरी, विनित मिश्रा, ओम सिंग तसेच रोहन दडले, सुयश धास, यश शेंडे, संग्राम कणसे, मोहित दंडेले यांचा समावेश आहे.
तरी संबंधीत खेळांडुनी त्यांचे मानधन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथुन कार्यालयीन वेळेत प्राप्त करुन घ्यावे, त्यासाठी त्यांनी आपल्या बँक खात्याची व आधारकार्डची छायाकिंत प्रत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे जिल्हा क्रिडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी कळविले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here