प्रतिकार न्युज
📝 अहेरी : राजाराम पासून ७ कि.मि.अंतरावर असलेल्या मरनेल्ली येथे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला, दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार तर सह उदघाटक जि. प. सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सदस्या सौ.सुरेखाताई आलाम, किस्टापुरचे माजी उपसरपंच अशोक येलमुले, खांदला ग्रा.प. चे माजी सरपंचा सौ.शंकुतला कूळमेथे, ग्रा.पं. माजी सदस्य सुधाकर आत्राम, पेसा अध्यक्ष सुरेश पेंदाम, सौ.वंदना अलोने, बिचू मडावी, धर्मा पेंदाम, सुरेश पेंदाम, श्रीनिवास राऊत, पांडु गावडे, मधुकर झोडे, इस्पात गावडे, हिरामण कोणम, खांदलाचे माजी सरपंच भगवान मडावी, धाडू निमगडे, खांदलाचे उपसरपंच गुरुदास पेंदाम, रावजी अलीने, नारायण झाडे, लक्ष्मण झाडे, गजानन झाडे, पोरीया आत्राम, पिरू झोडे, चीना तलांडे, किसन दुर्गे आदि मान्यवर मंचावर उपस्थिति होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सदर गावांत अनेक अडचणी आहेत त्यातून प्रमुख अडचण रस्त्याची असुन येण्या जाण्यास त्रास सहन करवा लागतो, याची दखल घेत जि.प.मधून निधी उपलब्ध करून देवून येत्या काही दिवसात सदर रस्ता सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी प.स.सभापती यांनी सुध्दा अनेक समस्या बाबत सखोल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान मडावी यांनी केले तर संचालन लक्ष्मण डोंगरे तर आभार पांडू गावडे यांनी केले. यावेळी मंडळचे अध्यक्ष लक्ष्मण डोंगरे, पांडू गावडे, सीमोना आत्राम, सोडवली कोणम, मधुकर झोडे, ईश्वर तालांडे, रमेश आत्राम, प्रकाश झाडे व महिला पुरुष व युवक उपस्थित होते.