Home Breaking News धक्कादायक :- गुप्तधन काढून देण्याच्या नावाखाली बोगस आयुर्वेदिक डॉक्टरांनी एकास फसवीले

धक्कादायक :- गुप्तधन काढून देण्याच्या नावाखाली बोगस आयुर्वेदिक डॉक्टरांनी एकास फसवीले

63
0

 

त्या तथाकथित डॉक्टरसह  पोलिसांनी केली दोघांस अटक.

प्रतिकार न्यूज नेटवर्क :-

आधुनिक युग हे अंधश्रध्देला फाटा देणारे युग असले तरी अंधश्रध्देला बळी पडणाऱ्याची संख्या कमी नाही, तुमच्या घरी गुप्तधन आहे, बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी विशिष्ट पूजा करावी लागणार व या पूजेला एवढा खर्च येणार असे सांगत नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढले आहे अशातच गोंडसावरी येथील रवींद्र पेँदोर यांच्या घरी गुप्तधन असल्याचे सांगून एका आयुर्वेदिक बोगस डॉक्टरांनी त्यांच्याकडून तब्बल 2 लाख 50 हजार रुपयाची मागणी केली.

गुप्तधनाच्या नावाने स्वतःची फसवणूक झाली असल्याचे समजले असता त्यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेत तक्रार दिली.बोगस आयुर्वेदिक डॉक्टर अजय पडियाल व सागर पडियाल यांना पेंदोर यांनी एडव्हान्स म्हणून 45 हजार रुपये दिले. उर्वरित 2 लाख तात्काळ द्यावे यासाठी आरोपींनी पेंदोर कडे तगादा लावला होता मात्र आपली आता फसगत होत असल्याचा संशय आल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेत तक्रार दिली होती दरम्यान उर्वरित 2 लाख रुपये इंदिरा नगर चंद्रपूर येथे घेऊन येण्यास सांगितले.असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पथक तयार केले स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी सागर पडियाल ला अटक केली, त्याने सांगितले की मी व माझे वडील आयुर्वेदिक डॉक्टर व पूजा करणारे महाराज म्हणून नागरिकांची फसवणूक केली असल्याची कबुली पोलिसांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेने फिर्यादी मार्फत मूल येथे तक्रार दाखल केली व पुढील तपास मूल पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here