Home Covid- 19 ११८३ पॉझिटिव्ह; नऊ बाधितांचा मृत्यू

११८३ पॉझिटिव्ह; नऊ बाधितांचा मृत्यू

49
0
(NILESH NAGRALE)

नागपूर : करोना पॉझिटिव्हमध्ये शनिवारी १,१८३ रुग्णांची भर पडली. शहरात ९०४ आणि ग्रामीणमध्ये २७६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. शनिवारी नऊजणांचा करोनाने मृत्यू झाला. यात शहरातील ५, ग्रामीणमधील १ आणि जिल्ह्याबाहेरील तिघांचा समावेश आहे.

शनिवारी १० हजार ७८८ तपासण्या करण्यात आल्या. आतापर्यंत १२ लाख ९९ हजार ६५७ तपासण्या करण्यात आल्या असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १ लाख ५६ हजार ४५८ झाला आहे. बरे होणाऱ्यांपेक्षा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने ९४ टक्क्यांपर्यंत गेलेली बरे होणाऱ्यांची टक्केवारी आता ९०.३३ टक्क्यांवर आली. शनिवारी ८६० रुग्ण करोनातून बरे झाले. आतापर्यंत १ लाख ४१ हजार ३२९ रुग्ण करोनातून बरे झाले.

जिल्ह्याची स्थिती

शनिवारचे पॉझिटिव्ह : ११८३

दैनिक तपासण्या : १०,७८८

शनिवारचे मृत्यू : ९

बरे झालेले : ९०.३३ टक्के

अॅक्टिव्ह रुग्ण : १०,७४६

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here