Home आपला जिल्हा डेरा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग काल अचानक डेरा आंदोलनातील संतप्त...

डेरा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग काल अचानक डेरा आंदोलनातील संतप्त कोविड योध्द्या

23
0

Pratikar News

(पप्पू देशमुख)

 

कामगारांनी वैद्यकीय महाविद्यालयावर हल्लाबोल केल्यानंतर हे आंदोलन चिघळले.
८ महिन्यांच्या थकीत पगारामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांचे उग्र रूप पाहिल्यानंतर काल पोलीस व जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाला गांभीर्याने घेतलेले आहे. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कार्यप्रणालीमुळे कामगारांचे वेतन देण्यास विलंब होत असल्याची बाब जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाच्या लक्षात आलेली आहे .त्यामुळे या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनावर दबाव वाढविण्यात आलेला आहे.पडद्यामागे आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

विश्व सिंधी सेवा संगम चे डेरा आंदोलनाला समर्थन

काल ५ मार्च रोजी वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी कामगारांनी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात दंडा लेकर हल्लाबोल आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डेरा आंदोलन पूर्ववत सुरू करण्यात आलेले आहे. आज या आंदोलनाचा २७ वा दिवस होता. विविध संघटना व व्यक्तींनी आज डेरा आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. विश्व सिंधी सेवा संगमच्या शिष्टमंडळाने डेरा आंदोलनाच्‍या मंडपामध्ये भेट देऊन आपले समर्थन जाहीर केले. विश्व सिंधी सेवा संगमचे अध्यक्ष मोहन आसवानी,पदाधिकारी बोनी आसवानी, सागर दुधानी, विशाल गिडवानी इत्यादींचा या शिष्टमंडळात समावेश होता. ग्रीन प्लॅनेट चे प्रा. सुरेश चोपणे,काँग्रेस ओबीसी सेलचे उमाकांत धांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप गेडाम तसेच श्यामसुंदर पेनुरकर यांनी सुद्धा डेरा आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

 

 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here